Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

Municipal President Kishore Garole :मेहकरातील अतिक्रमणे होणार नियमाकूल; नगराध्यक्ष किशोर गारोळेंची मोठी राजकीय घोषणा

Municipal President Kishore Garole : नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच उध्दव सेनेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. स्वच्छता अभियान, सफाई कामगारांचा संप मिटवण्यासारखे ठोस निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी शहरातील अतिक्रमण नियमाकूल करण्याचा धडाकेबाज निर्णय जाहीर करून निवडणुकीतील प्रमुख आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे.

Municipal President Kishore Garole.
निवडणूक वचनपूर्तीला सुरुवात :“कागदपत्रे सादर करा, हक्काची जागा नियमात आणा” — नागरिकांना थेट आवाहन

मेहकर : नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच उध्दव सेनेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी केवळ घोषणांवर न थांबता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. स्वच्छता अभियान, सफाई कामगारांचा संप मिटवण्यासारखे ठोस निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी शहरातील अतिक्रमण नियमाकूल करण्याचा धडाकेबाज निर्णय जाहीर करून निवडणुकीतील प्रमुख आश्वासन पूर्ण करण्याचा निर्धार स्पष्ट केला आहे.
मेहकर शहरातील सन २०११ पूर्वी झालेली अतिक्रमणे नियमाकूल केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी केली असून, संबंधित नागरिकांनी आपल्या जागेबाबतचे वैध कागदपत्रे सादर करून नियमानुसार शुल्क भरावे, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे.
शहरातील हजारो नागरिक अतिक्रमणाच्या समस्येमुळे घरकुल योजनांच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊनच पालिका निवडणुकीदरम्यान उध्दव सेनेचे उमेदवार किशोर गारोळे यांनी अतिक्रमण नियमाकूल करण्याचे ठोस आश्वासन दिले होते. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू झाल्याने गारोळे यांच्या राजकीय इच्छाशक्तीची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
नगराध्यक्ष गारोळे यांनी स्पष्ट केले की, सन २०११ पूर्वीचे मालकी हक्काचे किंवा ताब्याचे कागदपत्र सादर करणाऱ्या नागरिकांची अतिक्रमणे नियमाकूल करण्यात येतील. त्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह नियमानुसार शुल्क भरून ही प्रक्रिया पूर्ण करावी.
नियमाकूल अतिक्रमणधारकांना घरकुलाचा लाभ
अतिक्रमण नियमाकूल झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना विविध घरकुल योजनांचा थेट लाभ देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी केली आहे. याअंतर्गत स्थायी जागेवर ५०० चौ. फुटांपर्यंत घरकुल बांधण्यास परवानगी देण्यात येणार आहे. घरकुलासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान, पाच ब्रास रेती तसेच सोलर योजनेसाठी पाच हजार रुपयांचा अतिरिक्त लाभ दिला जाणार आहे. तसेच कामगार नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“निवडणुकीत दिलेली आश्वासने कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवणे हेच आमचे राजकारण आहे,” असा स्पष्ट संदेश देत नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी शहरातील नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा व आपली अतिक्रमणे नियमाकूल करून घ्यावीत, असे आवाहन केले आहे.
निवडणूक विजयाला प्रत्यक्ष विकासाची जोड देत नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी घेतलेला हा निर्णय मेहकरच्या राजकारणात ‘वचनपूर्तीच्या राजकारणा’चा नवा अध्याय ठरत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top