Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Gold medal : शिर्ला येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक  

Gold medal : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एनसीसी उप-युनिटमधील लान्स कॉर्पोरल अखिलेश बोथे याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिरला येथील कॅडेट अखिलेश बोथे याने दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय थल सैनिक शिबिर 2025 मध्ये सुवर्णपदक पटकावले.

Gold medal

अखिल भारतीय थल सैनिक शिबिरात अखिलेश बाेथेने पटकावला अव्वल क्रमांक
पातूर : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एनसीसी उप-युनिटमधील लान्स कॉर्पोरल अखिलेश बोथे याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिरला येथील कॅडेट अखिलेश बोथे याने दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय थल सैनिक शिबिर 2025 मध्ये सुवर्णपदक पटकावले.
या शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील निवडक कॅडेट्सनी सहभाग नोंदवला होता. त्यात अखिलेशने जेडीएफएस आंतर-संचालनालय चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. या कठीण स्पर्धेत कॅडेट्सच्या शारीरिक क्षमता, मानसिक धैर्य आणि लष्करी कौशल्यांची कसून परीक्षा घेतली जाते.
अखिलेशच्या या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण विद्यापीठाचा गौरव झाला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, एनसीसी अधिकारी, प्राध्यापक आणि सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून, ही कामगिरी इतर तरुण कॅडेट्ससाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top