Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

foreign liquor :विदेशी दारूची अवैध वाहतुक करणारा गजाआड ; 3.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

foreign liquor : जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बुलढाणा शहरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून 3 लाख 56 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

foreign liquor

एलसीबीची धडक कारवाई: बुलढाणा शहरात नाकाबंदीत कारवाई , एकावर गुन्हा दाखल

बुलढाणा : जिल्ह्यात अवैध देशी, विदेशी व हातभट्टी दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बुलढाणा शहरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अटक करून 3 लाख 56 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध दारूविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून कारवाई सुरू करण्यात आली.
दि. 15 जानेवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम चारचाकी वाहनातून विनापरवाना विदेशी दारूची चोरटी वाहतूक करीत बुलढाणा शहरातील धाड नाका येथून सर्क्युलर रोडमार्गे चिंचोले चौकाकडे येत आहे. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने चिंचोले चौक येथे नाकाबंदी केली. त्यावेळी सचिन समाधान रिंढे (वय 31, रा. शेलसुर, ता. चिखली, जि. बुलढाणा) हा आरोपी त्याच्या ताब्यातील वाहनासह पकडण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या शिश्या – किंमत 56,410 रुपये, मारुती सुझुकी ‘एस-प्रेसो’ पांढऱ्या रंगाची कार – किंमत 3,00,000 रुपये, असा एकूण 3,56,410 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव), अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात पार पडली.
ही कारवाई पो.उपनि. अविनाश जायभाये,पो.हे.कों. दीपक लेकुरवाळे, शेख चांद,पो.ना. अनंता फरतळे, सुनिल मिसाळ,
म.पो.कों. आशा मोरे यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top