Mahabreaking

[breaking_news]

Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट

Leopard attack : शिंदी येथील चंदनपूर शिवारात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेवानिवृत्त शिक्षक तेजराव किसन खरात यांच्या शेतातील एका झाडावर वानर मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यापूर्वीही काही मोकाट कुत्री मृतावस्थेत सापडली होती. त्या घटनांमागेही बिबट्याचाच हात असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.

Leopard attack

साखरखेर्डा : शिंदी येथील चंदनपूर शिवारात बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सेवानिवृत्त शिक्षक तेजराव किसन खरात यांच्या शेतातील एका झाडावर वानर मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. यापूर्वीही काही मोकाट कुत्री मृतावस्थेत सापडली होती. त्या घटनांमागेही बिबट्याचाच हात असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला होता.

अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर

दोन दिवसांपूर्वी चंदनपूर पाझर तलाव परिसरात बिबट्याने एका प्राण्याची शिकार करून ती झाडावर नेल्याची घटना पुरुषोत्तम खरात यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना दिली. काही नागरिकांनी घटनेचे छायाचित्रे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवली. संबंधित ठसे बिबट्याचेच असल्याचे वनविभागाने सांगितले; मात्र अद्याप घटनास्थळी अधिकृत पाहणी करण्यात आलेली नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.

गेल्या महिनाभरापासून पाझर तलाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही काही कुत्री ठार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळीही देऊळगाव राजा येथील वन अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती; मात्र ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.

या भागात बागायती शेती मोठ्या प्रमाणावर असून मका, भुईमूग, कांदा आदी पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जागरण करावे लागते. त्यामुळे बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top