Mahabreaking

[breaking_news]

Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Teacher from Paturda : कवठळ–भेंडवळ मार्गावरील पेसोडा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पातुर्डा बु. येथील एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (दि. २ मार्च) सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली.

Teacher from Paturda

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; पेसोडा फाट्याजवळ भीषण अपघात

पातुर्डा बु. : कवठळ–भेंडवळ मार्गावरील पेसोडा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पातुर्डा बु. येथील एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार(दि. २ मार्च) सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली.
वृषाली प्रकाश गावंडे (वय ३६, रा. पातुर्डा बु.) असे मृत शिक्षिकेचे नाव असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होत्या. नेहमीप्रमाणे त्या एमएच २८ एएल ५८१५ क्रमांकाच्या दुचाकीने शाळेकडे जात असताना पेसोडा फाट्याजवळ मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात त्या गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाल्या. अपघातानंतर संबंधित वाहनचालक पातुर्डा फाट्याकडे भरधाव वेगाने पसार झाल्याची माहिती शेताकडे जाणाऱ्या नागरिकांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद व तामगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातस्थळ जळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
शवविच्छेदनानंतर पातुर्डा येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनामुळे पातुर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सासू-सासरे व आप्तपरिवार असा परिवार आहे.

बी. एस. पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शत्रुघ्न जाधव रुजू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top