Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

Smoke and flames create :  कर्नाटक येथून कापसाच्या गठाणी घेऊन बेतूल (मध्यप्रदेश)कडे निघालेल्या एमएच 40 बीएल 7771 क्रमांकाच्या ट्रकला रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रकमधून धूर आणि ज्वाळा उसळल्याने महामार्गावर काही काळ खळबळ उडाली.

Smoke and flames create
देऊळगाव राजा अग्निशामक दलाची धाव; २० मिनिटांत आगीवर नियंत्रण

गजानन भालेकर

धोत्रा नंदाई :  कर्नाटक येथून कापसाच्या गठाणी घेऊन बेतूल (मध्यप्रदेश)कडे निघालेल्या एमएच 40 बीएल 7771 क्रमांकाच्या ट्रकला रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ट्रकमधून धूर आणि ज्वाळा उसळल्याने महामार्गावर काही काळ खळबळ उडाली.

अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत ट्रकचालकाला तातडीने इशारा दिला. चालकाने वेळेत ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून खाली उतरल्यानंतर संभाव्य जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. कापसाच्या गठाणींना आग लागल्याने ज्वाळा भडकल्या आणि धुराचे लोट आकाशात पसरले.

घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालक भगवान मापारी यांच्यासह अग्निशामक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अवघ्या २० मिनिटांत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात पथकाला यश आले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जैन, संजय शिंगणे, नारायण जाधव, माजी सरपंच इंदर मुंडे, दीपक नागरे आदींनी जेसीबीच्या साहाय्याने प्रशासनाला मदत केली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आणणे सुलभ झाले.

या आगीत कापसाच्या गठाणींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रकचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहनचालकांची सतर्कता, अग्निशामक दलाची तत्परता आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top