Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

road robbery : चिखली–लव्हाळा रस्त्यावर रोड रॉबरीचा थरार; रस्ता अडवून वाहनांवर दगडफेक

road robbery : चिखली–मेहकर मार्गावरील लव्हाळा नजीकच्या पाटोदा फाट्यावर अज्ञात चोरट्यांनी रस्ता अडवून वाहनांवर दगडफेक करत रोड रॉबरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत दहा ते पंधरा वाहनांच्या काचा फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

road robbery

साखरखेर्डा पोलिसांचा रात्रभर कडेकोट बंदोबस्त

साखरखेर्डा  : चिखली–मेहकर मार्गावरील लव्हाळा नजीकच्या पाटोदा फाट्यावर अज्ञात चोरट्यांनी रस्ता अडवून वाहनांवर दगडफेक करत रोड रॉबरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १६) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेत दहा ते पंधरा वाहनांच्या काचा फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी पाटोदा फाट्यावर हायवेवर दगड टाकून तसेच प्रवासी निवाऱ्यातील बाकडे आडवे ठेवून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखत गाड्या न थांबवता वेगात पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रवासी निवाऱ्याच्या आडून जाणाऱ्या वाहनांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.

याच वेळी सैलानी येथे दर्शनासाठी जात असताना साखरखेर्डा येथील बाबुसेठ कुरेशी यांच्या चारचाकी वाहनाचे टायर फुटले. मात्र वाहनात क्रूझरमध्ये ८ ते १० जण असल्याचे दिसताच चोरट्यांचा रॉबरीचा प्रयत्न फसला.

घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक परिहार यांच्यासह साखरखेर्डा, चिखली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्रभर परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली; मात्र चोरटे फरार झाले.

दरम्यान, रोड रॉबरीचा प्रयत्न फसल्याने चोरटे आजूबाजूच्या गावांमध्ये चोरीचा प्रयत्न करू शकतात, या शक्यतेने ठाणेदार गजानन करेवाड यांनी परिसरातील पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पाटोदा रस्त्यावरील सवडद येथील ग्रामविकास अधिकारी गौतम गवई यांच्या शेतातून कोंबड्या, एक क्विंटल कापूस व सोयाबीन चोरीला गेल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला असून त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी रात्रभर तळ ठोकून बंदोबस्त ठेवल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र जिल्ह्यात वाहनांद्वारे प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पारदर्शक कारभाराला चोरट्यांनी जणू खुले आव्हान दिल्याची चर्चा होत आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहन थांबवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकावर दरोडेखोरांचा हल्ला; दगडफेकीत तीन वाहनांचे मोठे नुकसान

मेहकर : जिल्हा मुख्यालयात आयोजित महसूल क्रीडा स्पर्धा २०२६ संपल्यानंतर परतीच्या प्रवासात असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. दगडफेकीमुळे तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका महसूल सेवकास गंभीर दुखापत झाली आहे.

दि. १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार) रोजी महसूल क्रीडा स्पर्धा २०२६ अंतर्गत कार्यक्रम जिल्हा मुख्यालयी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम सकाळी ९ वाजेपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू होता. कार्यक्रम संपल्यानंतर मेहकर उपविभागांतर्गत मेहकर व लोणार तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी अधिग्रहीत खाजगी वाहने तसेच वैयक्तिक वाहनांद्वारे आपल्या मुख्यालयाकडे परत निघाले होते.यादरम्यान, त्यांच्या वाहनांवर पाटोदा फाट्यावर अज्ञात दरोडेखोरांनी दगडफेक केली. यामध्ये तीन वाहनांचे नुकसान झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top