Mahabreaking

🔴 BREAKING
The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष

A young man died : जनुना शिवारात युवकाचा मृत्यू;घात कि अपघात परिसरात चर्चा

A young man died : जनुना–जयपूर रोडवरील जनुना शिवारात अनिल जैस्वाल यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात एका युवकाचा १७ जानेवारी रोजी मृतदेह आढळला. या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. फारुख शहा सलीम शहा (वय ३०, रा. अकोला, ह.मु. कोथळी, ता. मोताळा) असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान, या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र युवकाचा घात झाला कि अपघात याविषयी चर्चा सुरू आहे.

accident
मोताळा: जनुना–जयपूर रोडवरील जनुना शिवारात अनिल जैस्वाल यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यात एका युवकाचा १७ जानेवारी रोजी मृतदेह आढळला. या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. फारुख शहा सलीम शहा (वय ३०, रा. अकोला, ह.मु. कोथळी, ता. मोताळा) असे मृतकाचे नाव आहे. दरम्यान, या युवकाचा अपघातात मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र युवकाचा घात झाला कि अपघात याविषयी चर्चा सुरू आहे.
या घटनेची खबर नरेश सुरेश मानकर (वय ५०, व्यवसाय शेती, रा. जनुना, ता. मोताळा) यांनी पोलिसांना दिली. ते जनुना गावचे पोलीस पाटील असून, गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान नाल्यात एक इसम दुचाकीसह पडलेला व मृत अवस्थेत आढळून आला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन इसम नाल्यात पडला. नाल्यातील मोठ्या दगडावर डोके आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी एच.एफ. डिलक्स कंपनीची दुचाकी (क्र. MH-30 BU 7246) आढळून आली. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार या प्रकरणी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार श्रीकांत चिटवार करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top