Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

A speeding tipper :भरधाव टिप्परने कट मारुन दुचाकीस्वारास केले जखमी; लोखंडी रॉडने हल्लाही केला

A speeding tipper : मंडपगाव येथे भरधाव व निष्काळजीपणे टिप्पर चालवून दुचाकीस्वारास पाडून जखमी केल्याची तसेच नंतर लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

tipper truck
मंडपगाव येथील घटना : एकाविरुध्द गुन्हा दाखल, दुचाकीस्वार गंभीर जखमी
देऊळगाव राजा : मंडपगाव येथे भरधाव व निष्काळजीपणे टिप्पर चालवून दुचाकीस्वारास पाडून जखमी केल्याची तसेच नंतर लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल दत्तात्रय देशमुख (वय २६, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. मंडपगाव, ता. देऊळगाव राजा) हे दुचाकी क्रमांक MH28 AF 8662 ने घरी जात असताना दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास ग्राम मंडपगाव हद्दीत ही घटना घडली. नमूद वेळी आरोपी पंकज संजय कदम (रा. मंडपगाव) याने त्याच्या ताब्यातील टिप्पर वाहन क्रमांक MH28 BB 7864 हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत फिर्यादीच्या दुचाकीस कट मारला. त्यामुळे फिर्यादी खाली पडून जखमी झाला. त्यानंतर फिर्यादीने याबाबत जाब विचारला असता आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या इतर व्यक्तींना देखील आरोपीने लोटपाट करून त्यांचे कपडे फाडल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top