Samarth College of Pharmacy : समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे बी. फार्मसी द्वितीय वर्ष व एम. फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बी. फार्मसी प्रथम वर्ष व एम. फार्मसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात आयोजित केला होता. हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे, सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

देऊळगाव राजा : समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, देऊळगाव राजा येथे बी. फार्मसी द्वितीय वर्ष व एम. फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बी. फार्मसी प्रथम वर्ष व एम. फार्मसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात आयोजित केला होता. हा कार्यक्रम संस्थेच्या अध्यक्षा नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे, सहसचिव तथा आमदार मनोज कायंदे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या प्रसंगी श्री संत गजानन महाराज संस्था, देऊळगाव राजा यांचे सचिव सतीश कायंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे, उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे, विभागप्रमुख डॉ. पी. आर. लड्डा, प्रा. के. बी. चराटे, डॉ. पी. एस. नारखेडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात श्री. सतीश कायंदे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आई-वडील तसेच ज्येष्ठांचा आदर करावा आणि महाविद्यालयात नियमित उपस्थित राहावे, असे त्यांनी सांगितले. यानंतर बोलताना प्राचार्य डॉ. प्रफुल्ल ताठे यांनी महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. उपप्राचार्य डॉ. गोपालकृष्ण सीताफळे यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी पाच तत्त्वे अंगीकारावीत तसेच जिद्द व मेहनत जोपासावी, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन सोमेश राऊत, अंजली सोनुने, भागवत मुंढे, इद्रायनी मुंढे, व्यंकटेश तिडके व भूमिका खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंचल खरात यांनी केले.
यावेळी मिस्टर फ्रेशर व मिस फ्रेशर म्हणून आदित्य जायभाय व साक्षी काळे यांची निवड करण्यात आली. एम. फार्मसी विभागातून आकांक्षा पटेल व सुशील कायंदे यांची निवड करण्यात आली.फ्रेशर्स वेलकम पार्टीच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. ओम खार्डे, प्रा. देवानंद डोंगरे, प्रा. निवृत्ती पनसिर, प्रा. योगेश उबरहांडे, प्रा. मीनाक्षी चित्ते, प्रा. डॉ. जयश्री सानप, प्रा. गौरव जोगडे, शरद नागरे, सागर निकम, कोठेकर, शरद डोईफोडे, टाले, तृप्ती वाघमारे, प्रतीक्षा कांबळे, प्रतीक्षा गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच विद्यार्थ्यांमधून श्रीकांत कायंदे, संकेत शेरे, महेश पांडे, चैतन्य ताठे, संजीवनी नागवे, शीतल घुगे, शीतल बनकर, कोमल खेडेकर, गणेश जाधव व संपूर्ण डी. फार्म द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

