Mahabreaking

🔴 BREAKING
Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार

Jawan Vikas Wankhede :जवान विकास वानखडे यांना साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

Jawan Vikas Wankhede :गावाचे सुपुत्र आणि आयटीबीपी जवान विकास विश्वनाथ वानखडे  यांना जाटुसाना रेवडी राज्य हरियाणा येथे कर्तव्यावर सेवेदरम्यान ४ एप्रिलला वीरमरण आले. त्यांच्या पार्थीवावर बोरगाव मंजू येथे ५ एप्रिल रोजी शासकीय  इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Jawan Vikas Wankhede

बोरगाव मंजू येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

संजय तायडे

बोरगाव मंजू :  गावाचे सुपुत्र आणि आयटीबीपी जवान विकास विश्वनाथ वानखडे  यांना जाटुसाना रेवडी राज्य हरियाणा येथे कर्तव्यावर सेवेदरम्यान ४ एप्रिलला वीरमरण आले. त्यांच्या पार्थीवावर बोरगाव मंजू येथे ५ एप्रिल रोजी शासकीय  इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

गत काही वर्षांपासून आयटीबीपी सेवा देणाऱ्या जवान विकास वानखडे यांचे पार्थिव शरीर ५ एप्रिल रोजी  त्यांच्या मूळगाव बोरगाव मंजू निवासस्थानी येथे पोहोचले. त्यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या साश्रुनयनांनी गावात एकच आक्रोश झाला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला होता. विकास वानखडे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, वृद्ध आई-वडील आणि दोन लहान मुली, भाऊ असा परिवार आहे. वडिलांचे छत्र हरवल्याने त्या चिमुकल्या मुलींच्या आयुष्यावर दुःखाचे सावट पसरले आहे. कर्तव्यनिष्ठेने जीवन जगलेल्या या शूर जवानाचा अकाली अंत सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक ठरला आहे.

जवान विकास वानखडे यांना  सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या या वीरपुत्राचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात बोरगाव मंजू येथे करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला शोकाकुल वातावरणात मुखाग्नी देण्यात आला.  आयटीबीपी २८ जाटुसाना रेवडी हरियाणा राज्य कार्यरत होते. विशेष म्हणजे, कर्तव्य पार पाडत असताना गत चार महिने झाले विकास वानखडे आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान दिनांक 5 एप्रिल रोजी प्राणज्योत मावळली दुःखाची वार्ता ऐकून अचानक विकास वानखडे यांच्या  निधनाने वानखडे कुटुंबावर  आघात झाला आहे. दरम्यान जवान विकास वानखडे यांच्या अंत्ययात्रेला आयटीबीपी निरीक्षक पी. डी.हजारी लाल २८ वी वाहीनी यांच्या सह आयटीबीपी २८ जाटुसाना रेवडी राज्य हरियाणा  येथील जवान सह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top