Mahabreaking

[breaking_news]

mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार

mango orchards : लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथिल शेतकरी सतीश तेजनकर यांनी तीन वर्षांपूर्वी लावलेल्या एक हेक्टर आंबा बागेतील पंधराशे झाडांपैकी चौदाशे झाड आगीत पूर्णपणे जळून गेलेली आहे.याविषयी बातम्याही प्रकाशीत झाल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती.या वृत्तानंतर लगेचच प्रशासनाला जाग येऊन तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून अहवाल सादर केला.दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असे आश्वासन  भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ  यांनी दिले आहे.

mango orchards

 भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांचे आश्वासन

भागवत चव्हाण

लोणार :  लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथिल शेतकरी सतीश तेजनकर यांनी तीन वर्षांपूर्वी लावलेल्या एक हेक्टर आंबा बागेतील पंधराशे झाडांपैकी चौदाशे झाड आगीत पूर्णपणे जळून गेलेली आहे.याविषयी बातम्याही प्रकाशीत झाल्या आहेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी करण्यात आली होती.या वृत्तानंतर लगेचच प्रशासनाला जाग येऊन तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून अहवाल सादर केला.दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार असे आश्वासन  भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ  यांनी दिले आहे.

नुकसानग्रस्त शेतकरी सतीश तेजनकर यांनी एका निवेदना मार्फत तहसीलदारांसह भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांच्याकडे सुद्धा न्याय मागितला होता.  बुलढाणा किसान मोर्चाचे महामंत्री मारोतराव सुरोशे यांनी त्यांच्या लेटर पॅड वर निवेदन देऊन तहसीलदारांना सदर शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी केली आहे.यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मापारी,नुकसानग्रस्त शेतकरी सतीश तेजनकर,तालुका सरचिटणीस गणेश तांगडे यांच्यासह बरेच पदाधिकारी हजर होते.  8 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष   रामकृष्णजी वेताळ प्रदेश महामंञी रंगनाथजी सोळके प्रदेश संयोजक राहुल भोसले प्रदेश सहसंयोजक सुधाकर गिते बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष चक्रधर लांडे ,महामंत्री मारोतराव सुरुशे,प्रभाकर कायंदे,रामेश्वर जाधव,जिल्हा उपाध्यक्ष सखाराम कुलकर्णी,तालुकाध्यक्ष गजानन वरकड या सर्व पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याची संपूर्ण परिस्थिती व झालेले नुकसानी बाबत सविस्तर चर्चा करून शेतकरी सतीश तेजनकर व सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी ची मागणी केली.तर यावेळी प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी आग लागून सतिष तेजनकर या शेतकऱ्याचे तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या एक हेक्टर मध्ये 1500 पैकी 1400 झाडांचे आगिने होरपळून नुकसान झाले असल्याने सदर शेतकऱ्याची व्यथा शासन दरबारी मांडून आर्थिक दृष्टीने न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळी प्रदेशाध्यक्ष रामकृष्णजी वेताळ यांच्यासोबत भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रंगनाथजी सोळंके,प्रदेश संयोजक राहुलजी भोसले,सुधाकर गिते प्रदेश सहसंयोजक हजर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top