Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Shankarrao Jogi : व्हाईस ऑफ मिडीयाच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी  शंकरराव जोगी  

Shankarrao Jogi  : पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक कार्याचा वारसा जपणारे ज्येष्ठ पत्रकार शंकर रामराव जोगी यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीची पत्रकार संघटना ‘व्हाईस ऑफ मीडिया’ च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते जोगी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Shankarrao Jogi

संजय तायडे 

 बोरगाव मंजू : पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि सामाजिक कार्याचा वारसा जपणारे ज्येष्ठ पत्रकार शंकर रामराव जोगी यांची आंतरराष्ट्रीय ख्यातीची पत्रकार संघटना ‘व्हाईस ऑफ मीडिया’ च्या अकोला जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते जोगी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

ही नियुक्ती ऑनलाइन झूम मीटिंगद्वारे पार पडली. या बैठकीस आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय अध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश मुख्य संयोजक तथा संचालक गोरक्षनाथ मदने, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, तसेच नरेंद्र देशमुख आणि व्यंकटेश दुदमवार यांची प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. यावेळी मार्गदर्शक म्हणून रुबेन वाळके आणि अरुणभाऊ मोडक, तसेच विधी सल्लागार ॲड. संजय एस. देशमुख, सचिन मुर्तंडकर व संजय वाट उपस्थित होते.

तसेच या बैठकीला सतीश देशमुख, श्रीकांत पाचकवडे, समीर ठाकूर, प्रशांत भटकर, संजय दास, विनय टोले, दानिश चौधरी, अब्दुल सादिक अन्सारी, मोहन शेळके, मुकुंद कोरडे, मुकेश ढोके, प्रमोद मोरवील, विष्णू गावंडे, गणेश हिरोडकर, संदीप सोनवणे, संजय कातखेडे, विशाल पुरंदर, गजानन कुरई, देवानंद गहिले, संदिप देशमुख, प्रचारक ओलवे, शरद शगोकार, विकास गावंडे, विकास देशमुख, राजू क्षीरसागर, सिद्धार्थ तायडे, संतोष लोणकर, मधु कसबे, विक्रम मथने, विशाल पुरंदरे, संजय तायडे गुरुजी, जीवन सोनटक्के, दुलेखान पठाण, निशांत गवई, विजय केंदरकर, संतोष जुमडे, अमर तिवारी, मंगेश चराटे, सचिन जवंजाळ, संतोष अस्वार, रविंद्र दामोदर, विनायक बोरकर, पद्माकर उमाळे, कुशाल भगत, संतोष गवई, डॉ. दिगंबर खुरसुडे, संतोष काळे, संतोष सावजी, श्याम टक, दीपक राळे, सुनील वानखडे, संजय रडके, सोनू महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शंकर जोगी हे गेल्या २० वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी अनेक नामांकित दैनिकांच्या संपादकीय विभागात महत्त्वाची पदे भूषविली आहेत. प्रिंट मीडियासोबतच आसरा मीडिया न्यूज या इलेक्ट्रॉनिक माध्यमातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.  या बैठकीत अकोला जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी लवकरात लवकर स्थापन करण्याचा तसेच संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकारांच्या हितासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीमुळे अकोला जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top