Mahabreaking

[breaking_news]

Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे    

Digambar Lokhande : जिल्हा परिषद शाळांमधूनच अधिकारी तयार होतात. त्यामुळे, आपल्या मुलांचा जिल्हा परिषद शाळांमध्येच प्रवेश घ्या, असे आवाहना अकोला जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले.

Digambar Lokhande

गुढीपाडवा व पट वाढवा जिल्हास्तरीय शुभारंभ प्रवेश दिंडी उत्साहात

राहुल सोनोने

दिग्रस बू: जिल्हा परिषद शाळांमधूनच अधिकारी तयार होतात. त्यामुळे, आपल्या मुलांचा जिल्हा परिषद शाळांमध्येच प्रवेश घ्या, असे आवाहना अकोला जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी केले.

पातूर तालुक्यातील स्थानिक आदर्श जिल्हा परिषद केंद्र शाळा दिग्रस बु येथे  मुख्यकार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मॅडम (भा.प्र.से) जिल्हा परिषद अकोला यांनी “गुढिपाडवा आणि पट वाढवा ” हा उपक्रम सुरू केला त्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ दिग्रस बु येथून करण्यात आला. संपूर्ण गावांतून प्रवेश दिंडी सजवलेल्या बैल बंडितून पहिल्या वर्गातील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना बसवून गावातून बँड बाजा लेझीम सह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लोखंडे बोलत होते.

या वेळी शाळेच्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले  सर्व समित्यांचे पदाधिकारी सदस्य,उपस्थित पालक आणि गावकरी मंडळींनी शाळेची पटसंख्या वाढविण्याचा निर्धार केला. शाळेची प्रगतीचे वर्णन करणारे गितांचे गायन सुनंदा गवई आणि रमाबाई यांनी केले.यावेळी पटसंख्या वाढिच्या रथाला गटशिक्षणाधिकारी प्रवीण डाबेराव यांनी हिरवी झंडी दाखवली. बाहेर गावाहून शिक्षणासाठी विद्यार्थी पोहचवून देणारे वाहन चालकांना दिगंबरजी लोखंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला आणि गटविकास अधिकारी सतिश नायसे यांनी बॅनर आणि स्टिकर्स चे वाटप केले. यावेळी मंचावर दिगंबर लोखंडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, सतिश नायसे गटविकास अधिकारी, प्रविण डाबेराव गटशिक्षणाधिकारी, संजय बरडे मुख्याध्यापक , शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई गवई, सरपंच आशाताई कराळे, पोलीस पाटील नितीन गवई, परिविक्षाधीन तहसीलदार खंदारे साहेब यांची उपस्थिती होती. पटसंख्या वाढिचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक  दिगंबर बराटे,  सुनिल सदार,सदानंद ढोरे, सौ. कविता धनोकार, कु. आरती नैताम कु स्नेहल अरखराव सौ. प्रिती गवई यांच्या सह गावकरी मंडळींनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top