Mahabreaking

🔴 BREAKING
Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Dr. Deepak Bhagat :डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर Leopard attack :शिंदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; वानराचा बळी, शेतकऱ्यांत घबराट Smoke and flames create :धूर आणि ज्वाळांनी महामार्गावर खळबळ; वाहनचालकांच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली Azim Nawaz Rahi :अजीम नवाज राही यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ला लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर 18 meters seized :थकीत देयके वसुलीसाठी महावितरण आक्रमक; १८ मीटर जप्त

revenue department employees :महसूल कर्मचारी तालुकाध्यक्षांचा कौतुकास्पद उपक्रम; आरतीचे पुस्तक देत दिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा!

revenue department employees : भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संस्कृतीचे जतन करत सिंदखेडराजा येथील महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सोनूने यांनी मकर संक्रांतीनिमित्त एक आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला. केवळ ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ एवढ्यावर न थांबता, त्यांनी कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांना व कर्मचाऱ्यांना श्री गजानन महाराज यांच्या आरतीचे पुस्तक भेट देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

revenue department

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संस्कृतीचे जतन करत सिंदखेडराजा येथील महसूल कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय सोनूने यांनी मकर संक्रांतीनिमित्त एक आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम राबविला. केवळ ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ एवढ्यावर न थांबता, त्यांनी कार्यालयात येणाऱ्या ग्रामस्थांना व कर्मचाऱ्यांना श्री गजानन महाराज यांच्या आरतीचे पुस्तक भेट देत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

नेहमीच कामाच्या व्यापात असणाऱ्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक व धार्मिक बांधिलकी जोपासल्याचे या उपक्रमातून दिसून आले. मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर संजय सोनूने यांनी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे तिळगुळ देऊन स्वागत केले. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे त्यांनी स्वखर्चातून दिलेली गजानन महाराज आरतीची पुस्तके.

सोनूने यांच्या या भावनिक आणि संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महसूल कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांनी, “अशा उपक्रमांमुळे प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा अधिक घट्ट होतो,” अशा भावना व्यक्त केल्या. तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सांस्कृतिक मूल्ये जपण्याची गरज अधोरेखित केली.

आजच्या धावपळीच्या युगात मानवी मूल्ये आणि धार्मिक श्रद्धा जपणे अत्यंत गरजेचे आहे. संजय सोनूने यांच्या या पुढाकारामुळे केवळ सण साजरा झाला नाही, तर समाजासमोर एक सकारात्मक आदर्शही निर्माण झाला आहे. प्रशासनातील इतर विभागांनीही अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण व भावनिक उपक्रम राबवावेत, असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.यावेळी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top