Mahabreaking

🔴 BREAKING
mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार MLA Manoj Kayande :काँग्रेसच्या माघारीत आमदार मनोज कायंदेंनी बजावली निर्णायक भूमिका Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार MLA Manoj Kayande :काँग्रेसच्या माघारीत आमदार मनोज कायंदेंनी बजावली निर्णायक भूमिका Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली

Veterinary Dispensary :साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ बंद ,मंजूर चारही पदे रिक्त  

Veterinary Dispensary : सिंदखेडराजा तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – १ ची दोन दवाखाने आहेत. एक सिंदखेडराजा आणि दुसरे साखरखेर्डा येथे आहे . परंतू कित्येक वर्षांपासून साखरखेर्डा येथील दवाखान्यात डॉक्टर नसल्याने हा दवाखाना बंद आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना उपचारासाठी खाजगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. याची दखल जिल्हा परिषदेने घेऊन बंद असलेला दवाखाना तत्काळ सुरू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे .

Veterinary Dispensary

 साखरखेर्डा  : सिंदखेडराजा तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी – १ ची दोन दवाखाने आहेत. एक सिंदखेडराजा आणि दुसरे साखरखेर्डा येथे आहे . परंतू कित्येक वर्षांपासून साखरखेर्डा येथील दवाखान्यात डॉक्टर नसल्याने हा दवाखाना बंद आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना उपचारासाठी खाजगी डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात. याची दखल जिल्हा परिषदेने घेऊन बंद असलेला दवाखाना तत्काळ सुरू करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे .

साखरखेर्डा पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत ३० ते ३५ गावे येतात. या भागात शेळी पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो . आज घडीला ५ हजारांपेक्षा जास्त शेळी आहेत . गो पालन केंद्र साखरखेर्डा येथे आहे . प्रत्येक शेतकऱ्यांकडे बैल , गाय , म्हैस अशी जनावरे आहेत . त्यांच्यावर उपचार करण्यासाठी साखरखेर्डा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे . या दवाखान्यातील सर्वच कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे . त्यामुळे हा दवाखाना बंद आहे . पशु पालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरकडे घेऊन उपचार करावे लागतात . आज श्रेणी १ चा दवाखाना असून याठिकाणी चार   इमारती उभ्या आहेत . परंतू एकाही इमारतीचे कुलूप कित्येक वर्षांपासून उघडले नाही . दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्या जागेत खुलेआम जुगार खेळला जातो . याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी लक्ष घालून साखरखेर्डा येथील सर्व रिक्त पदे भरुन दवाखाना सुरू करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top