Mahabreaking

[breaking_news]

MLA Manoj Kayande :काँग्रेसच्या माघारीत आमदार मनोज कायंदेंनी बजावली निर्णायक भूमिका

MLA Manoj Kayande : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने उमेदार दिला होता. त्यामुळे, ही निवडणुक चुरशी होणार होती. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सपकाळ यांना कॉल केला होता. तसेच अखेरच्या क्षणी रंगलेल्या हालचालींमध्ये  सिंदखेडराजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी निर्णायक भूमिका बजावली. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात आमदार कायंदे यांचाही समावेश होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून काँग्रेसने या निवडणुकीत माघार घेण्याची घोषणा केली आहे.

MLA Manoj Kayande

 प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात समावेश

गजानन तिडके

बारामती / बुलढाणा : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेच्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने उमेदार दिला होता. त्यामुळे, ही निवडणुक चुरशी होणार होती. ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही सपकाळ यांना कॉल केला होता. तसेच अखेरच्या क्षणी रंगलेल्या हालचालींमध्ये  सिंदखेडराजा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी निर्णायक भूमिका बजावली. अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठवण्यात आलेल्या शिष्टमंडळात आमदार कायंदे यांचाही समावेश होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून काँग्रेसने या निवडणुकीत माघार घेण्याची घोषणा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी अखेरच्या क्षणी मुंबईत पडद्यामागे वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. आमदार मनोज कायंदे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांच्याशी थेट संपर्क साधत बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांना सोबत घेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत बारामतीचा सर्वांगीण विकास, राजकीय स्थैर्य आणि बिनविरोध निवडणुकीतून सकारात्मक संदेश देण्याची भूमिका स्पष्टपणे मांडण्यात आल्याचे समजते.

सुरुवातीला पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसकडून माघार न घेण्याचा सूर होता. मात्र, दरम्यान Rohit Pawar यांनीही स्वतंत्र संपर्क साधल्याची चर्चा आहे. प्रदीर्घ चर्चेनंतर काँग्रेसने अखेर उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे बारामती पोटनिवडणूक जवळपास अविरोधतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

, हर्षवर्धन सपकाळ आणि मनोज कायंदे यांच्यातील जुने काँग्रेसी ऋणानुबंध या निर्णयप्रक्रियेत उपयोगी पडले. मतभेद बाजूला ठेवून विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देण्याचा संदेश या घडामोडीतून पुढे आल्याचे बोलले जात आहे. स्वर्गीय दादांच्या पश्चात बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, हा केवळ राजकीय निर्णय नसून विकासाभिमुख दूरदृष्टीचा भाग असल्याचेही अधोरेखित केले जात आहे.

या बैठकीस आमदार संजय खोडके, सनाजी मलिक, राजेश विटेकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, हर्षवर्धन सपकाळ, मनोज कायंदे आणि पालकमंत्री मकरंद पाटील यांचा बुलढाणा जिल्ह्याशी असलेला संबंध लक्षात घेता, बारामतीच्या पोटनिवडणुकीत बुलढाणा जिल्ह्याचा राजकीय प्रभाव ‘हायलाईट’वर राहिल्याची चर्चा रंगली आहे.

याचदरम्यान, मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Dhananjay Munde एकत्र विमानप्रवासात असताना, मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर थेट बोलणे करून दिल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top