Three young children die : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 6 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. या मुलांची आई आणि एका मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, नेमकी विषबाधा कशाने झाली याविषयी माहिती मिळाली नाही.

धाड येथील घटना; दोन दिवसांपासून सुरू होता त्रास
नागेश मोहिते
धाड : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 6 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. या मुलांची आई आणि एका मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, नेमकी विषबाधा कशाने झाली याविषयी माहिती मिळाली नाही.
धाड येथील तवक्कल नगर बुलढाणा रोडवर स्थीत वस्तीत मो.वसीम हे आपल्या कुटुबासह राहतात. 6 एप्रिल रोजी पहाटे 3 वा. सुमारास त्यांचा मुलगा म.अलि मी.वसीम वय 4 वर्षे,मसीरा म.वसीम वय 7 यांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला, तर अश्मीरा म.वसीम वय 12, फातीमा म.वसीम वय 10 आणि आफरीन म.वसीम वय 30 यांच्या वर बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यापैकी फातीमा हीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
4 एप्रिल रोजी सर्व कुटुंबीय जेवण झाल्यावर झोपले होते. त्यानंतर रात्रीतुन त्यांना अचानक मळमळ आणि उलट्या सुरु झाल्या सकाळी उठून सर्व सदस्य धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेले. दरम्यान उपचार घेतल्यानंतर त्यांना बरे वाटले. यामध्ये दुपारी मृतक दोन्ही बालकांसह त्यांची आई व भावंडांना पुन्हा त्रास झाल्याने ते गावातील खाजगी दवाखान्यात गेले व उपचार घेतले. रात्री पुन्हा सर्वांनी जेवण करुन झोपले रात्रीतून यातील सर्वांना पोटात मळमळ होणे उलट्या सुरु झाल्या यामध्ये म. अलि म.वसीम आणि मसीरा म.वसीम या दोघांची प्रकृती गंभीर होऊन त्यांचा मृत्यू झाला नागरिकांनी त्यांचेसह अश्मीरा म.वसीम फातीमा म.वसीम आणि आफरीन म.वसीम यांना तातडीने रुग्णालयात हलविले तेथे वरील दोन्ही बालके मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर उर्वरित तिघांना तातडीने बुलढाणा येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.उपचारादरम्यान फातीमा हीचाही मृत्यू झाला. दरम्यान, तीन बालकांचा मृत्यू अन्नातून विषबाधा झाल्याने झाला कींवा अन्य कारणांमुळे झाला असावा याचा शोध उत्तरीय तपासणी अहवालानंतर उकल होणार असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे. या घटनेची पोलीसांनी नोंद घेतली असुन अधिक तपास धाड पोलीस करत आहेत.

