Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Shailesh Savji :राष्ट्रपतींनी बुलढाणा जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घ्यावा; शैलेश सावजी यांचे राष्ट्रपतींना पत्र

Shailesh Savji : मॉसाहेब जिजाऊंची पावन भूमी, लोणार सरोवर, सिंदखेड राजा, शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर, तसेच भगवान शारंगधरांची भव्य मूर्ती अशा ऐतिहासिक व धार्मिक वारशामुळे बुलढाणा जिल्हा राज्यात वेगळी ओळख निर्माण करतो. दरम्यान, राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू या आयुष मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घ्यावा, अशी मागणी शैलेश सावजी यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.

Shailesh Savji
डोणगाव : मॉसाहेब जिजाऊंची पावन भूमी, लोणार सरोवर, सिंदखेड राजा, शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर, तसेच भगवान शारंगधरांची भव्य मूर्ती अशा ऐतिहासिक व धार्मिक वारशामुळे बुलढाणा जिल्हा राज्यात वेगळी ओळख निर्माण करतो. दरम्यान, राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू या आयुष मंत्रालयाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घ्यावा, अशी मागणी शैलेश सावजी यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या पत्राद्वारे केली आहे.
पत्रात सावजी यांनी नमूद केले आहे की, जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून किती गावांना दररोज नियमित पाणीपुरवठा होतो, याची प्रत्यक्ष माहिती घ्यावी. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था, शेतरस्त्यांचा प्रश्न, शेतीपंपांना अपुरा वीजपुरवठा, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. विदर्भातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाची स्थितीही तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या अडचणी, जीर्ण शाळा इमारती, तसेच धार्मिक व पर्यटनस्थळांच्या विकास आराखड्यांची प्रगती याचाही आढावा घ्यावा, असे पत्रात म्हटले आहे. शेगाव–पुणे–मुंबई रेल्वे मार्ग व खामगाव–जालना रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित कामांबाबतही स्पष्टता आणावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.औद्योगिक विकासाला चालना देऊन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी राष्ट्रपतींनी संबंधित यंत्रणांना दिशा द्यावी, अशी मागणी सावजी यांनी केली आहे. नियोजित दौऱ्यात या विषयांवर चर्चा करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली आहे.

डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top