Mahabreaking

[breaking_news]

Vitthalwadi sarpanch :“तु आमचा माणूस नाही” म्हणत मारहाण; विठ्ठलवाडी सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

Vitthalwadi sarpanch : डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विठ्ठलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी सरपंच धनराज मानसिंग राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

Vitthalwadi sarpanch

डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विठ्ठलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणी सरपंच धनराज मानसिंग राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ फेब्रुवारी रोजी फिर्यादीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंजाब लक्ष्मण गायकवाड (वय ४५, व्यवसाय शेती, रा. विठ्ठलवाडी, ता. मेहकर) हे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता बांधकाम कामगार फॉर्मवर ग्रामसेवकांची सही घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. त्यावेळी सरपंच धनराज मानसिंग राठोड यांनी “तु आमचा माणूस नाही, तुला सही देत नाही, तुला काय करायचे ते कर” असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

तसेच जिवे मारण्याची धमकी देत फिर्यादीस लोटपाट केल्याचे आणि खिळे असलेल्या काठीने डाव्या गालावर व कानाखाली मारहाण करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी अवस्थेत उपचार घेतल्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी आरोपी सरपंचाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका ईश्वर सोनुने करीत आहेत.दरम्यान, ग्रामपंचायत स्तरावरील या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

डोणगाव परिसरातील बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top