Mahabreaking

🔴 BREAKING
Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद

election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

election bell : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून स्थानिक राजकारणाला नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास विभागाच्या १७ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

election bell

प्रभाग रचना कार्यक्रम घोषित; हरकतींसाठी १३ एप्रिलपर्यंत मुदत

शेगाव: तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून स्थानिक राजकारणाला नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी ग्रामविकास विभागाच्या १७ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशानुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

या प्रक्रियेमुळे तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग येणार असून संभाव्य उमेदवार आणि स्थानिक गटबाजी आता सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. भास्तन, मच्छिद्रखेड, डोलारखेड, भोनगाव, पहूरपुर्णा, मनमगाव, गोळेगाव बु., पाडसुळ, आडसुळ, झाडेगाव, श्री क्षेत्र नागझरी, हिंगणा वेज, वरखेड बु., जवळा बु., जवळा पळ., गव्हाण, तित्रव, वरुड, तरोडा कसवा, शिरसगाव निळे, गायगाव बु., टाकळी विरो, चिंचोली का., अळसणा, सांगवा, जानोरी, तरोडा तरोडी, खेड, गोलखेड, पहूरजिरा, जलंब, मोरगाव दि., बेलूरा व माटरगाव बु. या ग्रामपंचायतींचा या प्रभाग रचना कार्यक्रमात समावेश आहे.
प्रभाग रचना प्रक्रियेनुसार तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून गावनिहाय सीमांकन निश्चित केले जाणार आहे. तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून प्रभागांच्या सीमांचे अंतिम निर्धारण होणार असून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी केली जाणार आहे.
प्रारूप प्रस्ताव २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. ३० मार्चपर्यंत समितीमार्फत प्राथमिक मान्यता देण्यात येईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ रोजी हरकती व सूचनांसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. हरकती सादर करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली असून, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे पाठवण्यात येईल. आयोगाच्या मंजुरीनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.
दरम्यान, प्रभाग रचनेत होणाऱ्या बदलांमुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, स्थानिक आघाड्या आणि राजकीय पक्ष यांचे लक्ष या प्रक्रियेवर केंद्रीत झाले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकांनी निर्धारित मुदतीत हरकती व सूचना सादर करून प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
शेगाव तालुक्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रभाग रचना स्थानिक राजकारणात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top