Mahabreaking

[breaking_news]

Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी

Fatal accident :गावंडगाव शिवारात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना ३ मार्च मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) हे या अपघातात ठार झाले. 

Fatal accident

राहुल सोनोने 

दिग्रस बु. : गावंडगाव शिवारात पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्याची दुर्दैवी घटना ३ मार्च मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) हे या अपघातात ठार झाले.

डॉ. दीपक भगत यांना इंग्लंडचे डिझाईन पेटंट जाहीर

पांगरताटी येथील मजूर कामासाठी बाहेरगावी जात असताना ऑटो क्रमांक एमएच १९ एई ८४२९ने प्रवास करत होते. दरम्यान, गावंडगाव मार्गावरील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ऑटो अचानक उलटला. अपघात इतका भीषण होता की प्रवासी मजूर रस्त्यावर फेकले गेले.

घटनेची माहिती मिळताच गावंडगाव येथील ग्रामस्थांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर जखमी असलेले राजू दामू जाधव (रा. पांगरताटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन महिला मजुरांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या प्रकरणी चान्नी पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पहाटेची वेळ व रस्त्याची स्थिती यामुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, अचानक झालेल्या या अपघातामुळे पांगरताटी गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top