Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Strong Women Leaders :बाळापूरात ‘सशक्त महिला नेत्री’ प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न; स्थानिक स्वराज्यात महिलांच्या नेतृत्वाला बळ

Strong Women Leaders : पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील महिला सरपंच व सदस्यांसाठी आयोजित ‘सशक्त महिला नेत्री’ प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. यशदा पुणे, जिल्हा परिषद अकोला, पंचायत समिती बाळापूर आणि पंचायतराज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापूर येथील शेळद ग्रामपंचायत सभागृहात ही कार्यशाळा १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

Strong Women Leaders

बाळापूर : पुनर्रचित राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यातील महिला सरपंच व सदस्यांसाठी आयोजित ‘सशक्त महिला नेत्री’ प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. यशदा पुणे, जिल्हा परिषद अकोला, पंचायत समिती बाळापूर आणि पंचायतराज प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापूर येथील शेळद ग्रामपंचायत सभागृहात ही कार्यशाळा १६ ते १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकरलोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा प्रभावी सहभाग वाढवणे, निर्णयप्रक्रियेत त्यांना सक्षम करणे आणि महिला स्नेही ग्रामपंचायत विकसित करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत पवार, गटविकास अधिकारी नाना पजई, प्राचार्य शीतल मेटकर, निर्देशक नागसेन बागडे, विस्तार अधिकारी दिग्विजय चव्हाण आदींच्या मार्गदर्शनाखाली सत्रसमन्वयक सुधीर सरकटे यांच्या समन्वयाने प्रशिक्षण पार पडले. यशदा प्रशिक्षक मनीषा राऊत, सोनू उपर्वट, अंजली ठाकरे, प्रज्ञा वानखडे, मंदाकिनी नवलकर, वनिता उमरावते, कल्याणी बरडिया, ललिता कात्रे, नेहा सिरसाट, अनिता वाडेकर आणि रूपाली वाकोडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रशासकीय कौशल्यविकास, शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आर्थिक नियोजन व ग्रामविकासातील पारदर्शकता या विषयांचा समावेश होता. शेळद, कुपटा, सांगवी जोमदेव, मनारखेड, जोगलखेड, कळंबा बु., सातरगाव आणि टाकळी खोजबळ येथील महिला सरपंच व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप १८ फेब्रुवारी रोजी प्रमाणपत्र व पुस्तिकांचे वितरण करून करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला नेतृत्व अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top