Mahabreaking

[breaking_news]

Shiv Jayanti :डोणगावात शिवजयंती मिरवणूक उत्साहात; मान्यवरांच्या हस्ते पूजन, पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shiv Jayanti : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डोणगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, डोणगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Shiv Jayanti

डोणगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डोणगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, डोणगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्थानिक आठवडी बाजार परिसरात सकाळी ९ वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रभातफेरी मार्गाने संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख चौकांमध्ये मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

माजी सभापती निंबाजी पांडव, अर्जुनराव बाजड व दीपक गायकवाड यांनी वाय.टी. चौकात शिवाजी महाराजांचे पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजनाचे कार्यक्रम पार पडले.

मिरवणुकीदरम्यान शिवरायांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, शांतता समितीचे सदस्य व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उत्सव शांततेत व उत्साहात पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top