Mahabreaking

🔴 BREAKING
Bee attack :चान्नी बसस्थानकाजवळ मधमाश्यांचा हल्ला; १५० पेक्षा अधिक डंख, एक जण गंभीर   Speeding tipper hits bike :भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; तरोडा येथील वृद्धाचा जागीच मृत्यू Subsidy on submersible pump :सबमर्सिबल पंप, शिलाई मशीन व पिठाची चक्कीवर अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन A step towards transparency: पारदर्शकतेकडे पाऊल : शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवा तपशील आता सर्वांसाठी खुले Husband kills :पत्नीला त्रास देणाऱ्याचा पतीने केला खून; मेहकर पोलिसांचा १२ तासांत खुनाचा उलगडा Brutal murder :मेहकर एमआयडीसीत कापड व्यावसायिकाचा निर्घृण खून; चेहरा दगडाने ठेचला Bee attack :चान्नी बसस्थानकाजवळ मधमाश्यांचा हल्ला; १५० पेक्षा अधिक डंख, एक जण गंभीर   Speeding tipper hits bike :भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; तरोडा येथील वृद्धाचा जागीच मृत्यू Subsidy on submersible pump :सबमर्सिबल पंप, शिलाई मशीन व पिठाची चक्कीवर अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन A step towards transparency: पारदर्शकतेकडे पाऊल : शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवा तपशील आता सर्वांसाठी खुले Husband kills :पत्नीला त्रास देणाऱ्याचा पतीने केला खून; मेहकर पोलिसांचा १२ तासांत खुनाचा उलगडा Brutal murder :मेहकर एमआयडीसीत कापड व्यावसायिकाचा निर्घृण खून; चेहरा दगडाने ठेचला

Speeding tipper hits bike :भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; तरोडा येथील वृद्धाचा जागीच मृत्यू

Speeding tipper hits bike :भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोताळा–बुलडाणा मार्गावरील बोराखेडी गावाजवळ बुधवारी (४ मार्च) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. अशोक सिताराम आघाम (वय ७०, रा. तरोडा) असे मृतकाचे नाव आहे.

Speeding tipper hits bike

 मोताळा : भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मोताळा–बुलडाणा मार्गावरील बोराखेडी गावाजवळ बुधवारी (४ मार्च) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. अशोक सिताराम आघाम (वय ७०, रा. तरोडा) असे मृतकाचे नाव आहे.

मोताळा नगर पंचायतीत समित्यांची फेररचना; विविध पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी

मिळालेल्या माहितीनुसार, तरोडा येथील अशोक आघाम हे आपल्या लुना दुचाकी (एमएच २८ एएल १५६५) वरून मोताळ्याकडून बुलडाण्याकडे जात होते. दरम्यान, बोराखेडी गावाजवळील वळणावर समोरून येणाऱ्या टिप्पर (एमएच ५६ सी ०१९७) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, या अपघातात आघाम यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) बालाजी शेंगेपल्लू यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथील रुग्णालयात पाठविला. तसेच अपघातग्रस्त टिप्पर व दुचाकी ताब्यात घेऊन बोराखेडी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत बोराखेडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top