Mahabreaking

🔴 BREAKING
Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Motala Nagar Panchayat :मोताळा नगर पंचायतीत समित्यांची फेररचना; विविध पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी

Motala Nagar Panchayat : मोताळा नगर पंचायतीत आज झालेल्या विशेष सभेत विषय समित्यांची पुनर्रचना करत नव्या सभापतींची निवड करण्यात आली. उपजिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार व २० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या विशेष सभेच्या नोटिशीप्रमाणे ४ मार्च २०२६ रोजी ही सभा पार पडली. समिती सदस्य नामनिर्देशन आणि सभापती पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

Motala Nagar Panchayat

मोताळा : मोताळा नगर पंचायतीत आज झालेल्या विशेष सभेत विषय समित्यांची पुनर्रचना करत नव्या सभापतींची निवड करण्यात आली. उपजिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या आदेशानुसार व २० फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या विशेष सभेच्या नोटिशीप्रमाणे ४ मार्च २०२६ रोजी ही सभा पार पडली. समिती सदस्य नामनिर्देशन आणि सभापती पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.
यामध्ये स्थायी समितीचे गठन करण्यात आले असून सभापतीपदी नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच शिक्षण समितीच्या सभापती म्हणून उपाध्यक्ष शहनाज बी. शेख सलीम यांची नियुक्ती करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम व नियोजन समितीच्या सभापतीपदी सौ. सरिता विजय सुरडकर यांची निवड झाली. त्यांच्या निवडीसाठी शेख तस्लीम शेख सलीम यांनी सुचविले तर निना सिताराम इंगळे यांनी अनुमोदन दिले.
पाणीपुरवठा व आरोग्य समिती समितीच्या सभापतीपदी प्रमोद दादाराव देशमुख यांची निवड झाली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव हसमत व्ही. जलील खान यांनी मांडला तर रविंद्र देवराव पाटील यांनी अनुमोदन दिले.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अनिता कैलास झंवर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या नावाचा प्रस्ताव खातून बी. शेख रशीद यांनी मांडला आणि सिंधुताई शंकर वानखेडे यांनी अनुमोदन दिले.
नगर पंचायतीतील या फेरबदलामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना चालना मिळाली आहे. विविध समित्यांवर नव्या नेतृत्वाला संधी देत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आगामी काळात विकासकामांना गती मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top