Mahabreaking

🔴 BREAKING
Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Subsidy on submersible pump :सबमर्सिबल पंप, शिलाई मशीन व पिठाची चक्कीवर अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन

Subsidy on submersible pump :पंचायत समिती देऊळगाव राजा अंतर्गत सेस फंड योजना (सन २०२५-२६) राबविण्यात येत असून समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच दिव्यांग कल्याण या योजनांद्वारे लाभार्थ्यांना विविध साहित्य अनुदानावर देण्यात येणार आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून २ मार्च ते १० मार्च २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

Subsidy on submersible pump

समाजकल्याण, महिला व दिव्यांगांसाठी सेसफंड योजना; १० मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत

देऊळगाव राजा : पंचायत समिती देऊळगाव राजा अंतर्गत सेस फंड योजना (सन २०२५-२६) राबविण्यात येत असून समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच दिव्यांग कल्याण या योजनांद्वारे लाभार्थ्यांना विविध साहित्य अनुदानावर देण्यात येणार आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून २ मार्च ते १० मार्च २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.

पत्नीला त्रास देणाऱ्याचा पतीने केला खून; मेहकर पोलिसांचा १२ तासांत खुनाचा उलगडा

पंचायत समितीच्या माहितीनुसार, २० टक्के समाजकल्याण योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर ५ एचपी क्षमतेचा सबमर्सिबल विद्युत पंप देण्याचा प्रस्ताव आहे. तसेच १० टक्के महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदानावर शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय ५ टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना १०० टक्के अनुदानावर पिठाची चक्की देण्याचेही प्रस्तावित आहे. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील मागासवर्गीय शेतकरी, महिला आणि दिव्यांग नागरिकांना स्वावलंबी बनविणे हा आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत गटविकास अधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा यांच्याकडे सादर करावेत. अर्जाचे नमुने ग्रामपंचायत कार्यालय तसेच पंचायत समिती देऊळगाव राजा येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
योजनेविषयी अधिक माहिती घेण्यासाठी संबंधितांनी पंचायत समितीतील ग्रामपंचायत विभाग किंवा विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुकेश माहोर गटविकास अधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घेऊन शासनाच्या या योजनांचा फायदा करून घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top