Mahabreaking

[breaking_news]

Scholarship examinations :जिल्हाभरात उद्या इयत्ता चौथी, सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा, तयारी पूर्ण

Scholarship examinations : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७वी रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण १४९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेसाठी तालुकानिहाय परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा घेण्यासाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

Scholarship examinations

संजय तायडे 

अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेण्यात येणारी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ७वी रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण १४९ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेसाठी तालुकानिहाय परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. परीक्षा घेण्यासाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत.

जुबली इंग्लीश हायस्कुल कुंभारीतून अनुजा रिंगणे प्रथम

अ.क्र.  तालुका          ४थी       ७वी

१) अकोला पंस-      २५         २१

२) अकोला मनपा    ३             २

३) अकोट               १७          १०

४) बाळापुर             ११           १०

५)बार्शिटाकळी          ६              ५

६)मुर्तिजापुर               ८             ५

७) पातुर                    ६              ४

८) तेल्हारा                  १०            ६

एकूण                      ८६        ६३

22 हजार 620 विद्यार्थी देणार परीक्षा

या परीक्षेसाठी संपूर्ण अकोला जिल्ह्यामधुन इयत्ता ४थी चे १३४४९ व इयत्ता ७वी चे ९१७१ असे एकूण २२६२० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले आहे. जिल्हास्तरावरून परीक्षा केंद्राला भेटी देण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर परीक्षेचे दोन पेपर आहे

पेपर १ – प्रथमभाषा व गणित

वेळ सकाळी ११ ते १२.३०

पेपर २- तृतीय भाषा व बुद्धीमत्ता

वेळ दुपारी २.०० ते ३.३०

 

वाढत्या उन्हामुळे उपाय योजना करण्याचे आदेश

सदर परीक्षेचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असून उन्हाची तिव्रता लक्षात घेता सर्व केंद्रसंचालक यांना परीक्षा केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. तसेच परीक्षेदरम्यान एखादया विद्यार्थ्यांस काही त्रास झाल्यास तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून घेणेसाठी परीक्षा केंद्राच्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खाजगी डॉक्टर यांची माहिती ठेवण्याबाबत केंद्र संचालकांना कळविण्यात आले आहे.

या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी  जिल्हासमन्वयक म्हणून रतनसिंग पवार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सहसमन्वयक म्हणून  जितेंद्रकुमार प्रधान उपशिक्षणाधिकारी( प्राथमिक ) तसेच  श्याम राऊत विस्तार अधिकारी शिक्षण व  अरविंद जाधव विस्तार अधिकारी शिक्षण हे कामकाज पाहात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top