Anuja Ringane : शहराजवळील कुंभारी येथील जुबली इंग्लिश हायस्कूल या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचे नावलौकिक केले आहे. बाभूळगाव जहागीर येथील अनुजा उन्मेष रिंगणे हीने 95.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

शाळेचा सीबीएससी दहावीचा निकाल शंभर टक्के
अकोला : शहराजवळील कुंभारी येथील जुबली इंग्लिश हायस्कूल या शाळेने दरवर्षीप्रमाणे यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील 25 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचे नावलौकिक केले आहे. बाभूळगाव जहागीर येथील अनुजा उन्मेष रिंगणे हीने 95.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.
या शाळेत यावेळेस बाबुळगाव जहागीर येथील ग्रामीण विद्यार्थ्यांचे वर्चस्व राहिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचविला आहे. या शाळेत प्रथम येण्याचा मान बाभूळगाव जहागीर येथील अनुजा उन्मेष रिंगणे या विद्यार्थिनी प्रथम येण्याचा मान पटकविल आहे. तिला 95 टक्के 20 गुण मिळाले आहे तसेच वेदांत भरत उघडे हा बाभूळगावचा दुसरा प्राविण्य प्राप्त विद्यार्थी शाळेत ठरला आहे. त्याला 93.20 तसेच बाभूळगाव येथील जुबिया डॉक्टर साजिद खान पठाण तिला 85 टक्के मिळाले आहेत. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी मध्ये अनुक्रमे विलास अवचार 89 टक्के, अनुष्का देशपांडे 89 टक्के, आदित्य टाले ८६ टक्के तसेच अर्पित गावंडे, सृष्टी गावंडे, पल्लवी अंबुलकर, अक्षरा सौंदळे, निशा मुळे, वेदांत चोपडे, मोहम्मद मुजम्मिल, त्रिशा मंडळ, मधुरा आगळे, क्षितिज अरखराव, आर्यन धुमाळे, मधुरा कट्यारमल, आर्यन चव्हाण, प्रज्वल पांडे, अंजली ठोंबरे, भक्ती मुरूमकर, अक्षरा ओइंबे, त्रिशा कावटे, श्रावण खाडे हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शाळेचे नाव लौकिक केले आहे या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे शाळेतर्फे कौतुक करण्यात आले आहे. या विद्यार्थिनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक वृंद आई-वडिलांना दिले आहे.

