Mahabreaking

[breaking_news]

Traffic Congestion :बिबीत आठवडी बाजारात वाहतुकीची कोंडी, जागा पडतेय अपुरी

Traffic Congestion : लोणार तालुक्यातील बिबी गावात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने बाजारासाठी जागा कमी पडत आहे. आठवडी बाजारामुळे  कुंभेफळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. दर शनिवारी आठवडी बाजारामुळे वाहनांची कोंडी होत असल्याने प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Traffic Congestion

 प्रशासनाने उपाय योजना करण्याची होतेय मागणी : बाजार करणारेही त्रस्त

रमेश खंडागळे 

बिबी : लोणार तालुक्यातील बिबी गावात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने बाजारासाठी जागा कमी पडत आहे. आठवडी बाजारामुळे  कुंभेफळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होते. दर शनिवारी आठवडी बाजारामुळे वाहनांची कोंडी होत असल्याने प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोणार तालुक्यातील बीबी गाव जालना मेहकर महामार्गावर वसलेले आहे. गावची लोकसंख्या जवळपास 15 हजारापर्यंत असून येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो.  आसपासच्या दहा-पंधरा खेड्यातून लोक जीवनावश्यक वस्तू विकत घेण्यासाठी शनिवारी बाजारासाठी येतात व आठवडाभर लागणारा किराणामाल तसेच भाजीपाला  व इतर सामान खरेदी करतात. त्यामुळे बाजारात बाया बापड्या, लहान मुले तथा पुरुष मंडळीची अक्षरशः गर्दीच असते. पूर्वी पोलीस स्टेशनच्या मोकळ्या जागेचा वापर दुकाने थाटण्यासाठी व पार्किंग साठी केला जात होता. परंतु सध्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे बाजारासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बाजाराला येणारे बाजारकरी मंडळी व भाजीपाला आणि इतर सामान आणणारे विक्रेते आपले वाहने कुंभेफळ रोड कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी करतात. रस्त्यावर बाजारकर्त्या ग्राहकांची खूप गर्दी असते. त्यामुळे बाजारच्या दिवशी या रस्त्यावर वाहतूक ठप्प होते .गर्दीत छोट्या मोठ्या चोऱ्याही होतात ग्राहकांची आणि विक्रेत्यांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधितांनी वाहन तळासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थंकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top