Mahabreaking

[breaking_news]

Rajesh Nagare and Vinod Satpute Honored :राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने राजेश नागरे व विनोद सातपुते सन्मानित

Rajesh Nagare and Vinod Satpute Honored : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष राजेश नागरे आणि विनोद सातपुते ग्रामविकास अधिकारी यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आश्रय आशा फाउंडेशन मालेगावच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Rajesh Nagare and Vinod Satpute Honored

रमेश खंडागळे 

बिबी : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष राजेश नागरे आणि विनोद सातपुते ग्रामविकास अधिकारी यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आश्रय आशा फाउंडेशन मालेगावच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

शिंदी येथे बुद्ध विहार आणि सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन

सामाजिक सांस्कृतिक कार्याचा गौरव करणारा हा सोहळा आश्रय आशा फाउंडेशन मालेगाव च्या वतीने  25 एप्रिल रोजी हरिकेश लॉन्स मालेगाव जिल्हा नाशिक येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राजेश नागरे व विनोद सातपुते यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  राजेश नागरे व  विनोद सातपुते गेल्या कित्येक वर्षापासून गावात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी पुस्तकांची मदत करणे, गोरगरीब रुग्णांना वेळेत उपचारासाठी पोहोचवणे तसेच मदतीचे सहकार्य करणे, वाचनालयास मदत व सहकार्य, तसेच गावातील स्वच्छतेचा विषय, स्मशानभूमी सौंदर्यकरण, वृक्ष लागवड, असे विविध सामाजिक कामे ते नेहमी करत असतात. असे अनेक उपक्रम ते समाज विधेयक प्रेरणादायी बहुमोल कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी आश्रय आशा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएस प्रतापराव दिघावकर ,आय पी एस दर्शन दुगड, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ बारवाल, फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार ,सचिव श्रीमती आशाताई (अलका) बच्छाव हे होते कार्यक्रमाला बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते. यावेळी समाजसेवेचे  हे व्रत सुरूच राहील अशी भावना सत्कार प्रसंगी राजेश नागरे व विनोद सातपुते यांनी व्यक्त केली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top