Buddha Vihara : लोणार शहरापासून जवळच असलेल्या शिंदी येथील बुद्ध विहार तथा सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन भंते बी. राहुल, मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात व सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे काही कामानिमित्त मुंबईला गेले असल्यामुळे त्यांचे बंधू सतीश भाऊ कायंदे यांच्या हस्ते पार पडला.

बिबी : लोणार शहरापासून जवळच असलेल्या शिंदी येथील बुद्ध विहार तथा सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन भंते बी. राहुल, मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात व सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे काही कामानिमित्त मुंबईला गेले असल्यामुळे त्यांचे बंधू सतीश भाऊ कायंदे यांच्या हस्ते पार पडला.

लोणार तालुक्यात शिंदी व ब्राह्मण चिकणा या दोन गावांनी मिळून गट ग्रामपंचायत आहे. गावाची वस्ती साधारणता दोन अडीचशे घरांची आहे. त्यातही बौद्ध बांधवांची घरे 15 ते 20 च्या सुमारास आहेत. गावातील वातावरण एकोप्याचे आहे. गावातील लोक तसेच भविष्यातील नागरिक आजची लहान बालके यांच्यावर धम्म शिकवणुकीतून चांगले संस्कार पडावेत व गावाला भविष्यात विकासासाठी नीतिमान सक्षम नागरिक मिळावेत या हेतूने प्रेरित होऊन गावकऱ्यांच्या सहमतीने बौद्ध विहार व सामाजिक गृह बांधण्याचे ठरविले. त्यासाठी गावात जागा निश्चित करून काही निधी जमविला. आमदार मनोज कायंदे यांनी सामाजिक सभागृहासाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे कबूल केल्याचे समजते तर खरात यांनी बौद्ध विहारासाठी सुंदर आणि भव्य अशी तथागत भगवान बुध्दांची मूर्ती देण्याचे व आणखीही शक्य होईल तेवढी मदत करण्याचे कबूल केले. बौद्धविहाराच्या बांधकामाचे भूमिपूजन 25 एप्रिल रोजी संपन्न झाले. कार्यक्रमास अंबादास खंड, प्राध्यापक अरविंद चव्हाण, विठ्ठल चव्हाण, प्राध्यापक रवींद्र खरात, मुख्याध्यापक तुळशीदास घेवंदे, विष्णू केंद्रे, गुलाब झोटे, दिलीप झोटे, सुनील केंद्रे, रावसाहेब मोरे, शिवाजी डोंगरदिवे, सुधाकर डोंगरदिवे, रमेश खंडागळे ,प्रकाश सदगीर, सुधाकर वेव्हल, संतोष बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन गावच्या स्नुषा माधुरीताई वेव्हल नायब तहसीलदार जाफराबाद यांनी केले तर आभार वामनराव वेव्हल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचशील ध्वज समिती व वर्किंग कमिटीने परिश्रम घेतले.

