Go-Sanman : देशभरात सुरू असलेल्या ‘गोमाता सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत पातूर येथे आज (दि. २७ एप्रिल २०२६) भव्य रॅली काढण्यात आली. कडक उन्हाची तमा न बाळगता शेकडो गोसेवक, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. श्री सिदाजी महाराज मंदिर येथून सुरू झालेली ही रॅली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. गोवंश रक्षण, संवर्धन आणि गोहत्या प्रतिबंधासाठी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण गोभक्त समाज एकवटला होता. यावेळी पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

कडक उन्हातही गोभक्तांचा उत्साह; सिदाजी महाराज मंदिर ते तहसीलपर्यंत भव्य मोर्चा
पातूर : देशभरात सुरू असलेल्या ‘गोमाता सन्मान आवाहन अभियान’ अंतर्गत पातूर येथे आज (दि. २७ एप्रिल २०२६) भव्य रॅली काढण्यात आली. कडक उन्हाची तमा न बाळगता शेकडो गोसेवक, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. श्री सिदाजी महाराज मंदिर येथून सुरू झालेली ही रॅली तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. गोवंश रक्षण, संवर्धन आणि गोहत्या प्रतिबंधासाठी कठोर कायदे करण्याच्या मागणीसाठी संपूर्ण गोभक्त समाज एकवटला होता. यावेळी पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे यांना निवेदन सादर करण्यात आले.
सिरसो येथे अग्नितांडव; गोठा जळून खाक, मोठा अनर्थ टळला
रॅलीदरम्यान हभप कीर्तनकार व संत मंडळींच्या उपस्थितीत वातावरण भक्तिमय झाले होते. “गोमाता की जय”, “जय श्रीराम”, “भारत माता की जय”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “छत्रपती संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. गोसेवकांच्या हातातील ध्वज आणि ‘गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या’ अशा फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.संत-महाराजांनी आपल्या प्रवचनातून गोसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत समाजजागृती केली. गोमाता देशाच्या अर्थकारणाचा व शेती व्यवस्थेचा कणा असल्याने तिचे संरक्षण अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे हित आणि धर्मसंरक्षण यासाठी कठोर कायद्यांची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
रॅलीत समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “जोपर्यंत गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत हे अभियान सुरूच राहील,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.तहसील प्रांगणात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी शेकडो गोभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेऊन ते वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

