Mahabreaking

[breaking_news]

Positive Discussions :राज्य कर्मचारी व शिक्षक यांचा संप मागे, अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा

Positive Discussions : महाराष्ट्र राज्यातील १६ लाख कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिल पासून संपावर गेले होते  राज्य शासनाने संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत मागण्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर हटकर आणि सिंदखेडराजा उपविभागीय अध्यक्ष विकी जगताप यांनी दिली.

Positive Discussions

साखरखेर्डा : महाराष्ट्र राज्यातील १६ लाख कर्मचारी व शिक्षक २१ एप्रिल पासून संपावर गेले होते  राज्य शासनाने संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सोबत मागण्या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर हटकर आणि सिंदखेडराजा उपविभागीय अध्यक्ष विकी जगताप यांनी दिली.

२१ एप्रिल पासून १७ लाख राज्य कर्मचारी व शिक्षक आपल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेची कार्यपद्धती यासाठी संपावर गेले होते. कर्मचाऱ्यांना १ मार्च २०२४ सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. परंतू कार्यपद्धती , नियम , शर्ती व अटी अधिसूचना प्रसुत करण्यात आली नव्हती . १ मार्च २०२४ सेवानिवृत्त ६५०० कर्मचारी व शिक्षक यांना तात्पुरता लाभ मिळाला नाही . त्यामुळे त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे . सदरची अधिसूचना १५ दिवसांत काढली जाईल असे शासनाने प्रसूस्त केले आहे . गेल्या १५ महिन्यापासून शासनाने आमच्या ७ लक्षवेधी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे . त्यामुळे शासना सोबत चर्चा होऊ शकली नाही . मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी त्रैमासिक सभेचे आयोजन करण्यात येईल असे जाहीर केले आहे . चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक यांची पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले आहे . चतुर्थ श्रेणी कर्मचारी पाल्यांना प्राधान्य दिले जाईल ही मागणी सुध्दा करण्यात आली आहे . १०:२०:३० सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक व कर्मचारी यांना लागू करण्यात येईल यासह अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा झाल्याचे हटकर व जगताप यांनी सांगितले . त्यामुळे भविष्यात सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव तत्पर असेल अशी माहिती विकी जगताप यांनी दिली .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top