11th Grade Admissions : गत काही वर्षात अकरावी प्रवेशास विलंब होत असल्याने यंदा प्रवेश प्रक्रीया लवकरच सुरू होणार आहे. यंदा शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करत शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ११ वी प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना अधिक पारदर्शक व सुसूत्र प्रवेश प्रक्रिया मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ज़ाकिर अहमद
बाळापुर : गत काही वर्षात अकरावी प्रवेशास विलंब होत असल्याने यंदा प्रवेश प्रक्रीया लवकरच सुरू होणार आहे. यंदा शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा महत्त्वपूर्ण बदल करत शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी ११ वी प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना अधिक पारदर्शक व सुसूत्र प्रवेश प्रक्रिया मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बाळापुरात आठवडी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी, दर शनिवारी लागतात वाहनांच्या रांगा
नवीन नियमावलीनुसार यंदा ११ वी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया राज्यस्तरावर पाच स्वतंत्र ऑनलाइन फेऱ्यांद्वारे पूर्ण केली जाणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला किमान १० महाविद्यालयांना पसंतीक्रम देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पसंतीक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून, गुणवत्ता व उपलब्ध जागा यांचा समन्वय साधत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाचवेळी विविध पर्यायांचा विचार करून योग्य महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वीच्या तुलनेत यंदाची प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध असेल.
यंदा मुलींसाठी राहणार स्वतंत्र फेरी
राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी यंदा प्रथमच स्वतंत्र राखीव ऑनलाइन फेरी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष फेरीत केवळ विद्यार्थिनींनाच सहभागी होता येणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे जागांचे वाटप करण्यात येणार आहे. ही फेरी पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून, मुलींना प्राधान्य देत त्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहेत

