Mahabreaking

[breaking_news]

Traffic Congestion in Balapur :बाळापुरात आठवडी बाजारामुळे वाहतुकीची कोंडी, दर शनिवारी लागतात वाहनांच्या रांगा

Traffic Congestion in Balapur :शहरात जुना शहर मार्गावर दर शनिवारी आठवडी बाजार भरवण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते.  बाजारासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने, वाहने आणि खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Traffic Congestion in Balapur

मुख्य रस्त्यावर वाहने उभी असल्याने बस चालकांना करावी लागते तारेवरची कसरत

जाकिर अहमद  

 बाळापूर : शहरात जुना शहर मार्गावर दर शनिवारी आठवडी बाजार भरवण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होते.  बाजारासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने, वाहने आणि खरेदीदारांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मुंबई-नागपूर व हैदराबाद-मुंबई महामार्गाशी जोडलेले बाळापूर हे महत्त्वाचे शहर असून येथे सुमारे ५५ हजार लोकसंख्या आहे. दर शनिवारी लागणाऱ्या बाजारासाठी परिसरातील १० ते १५ गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. किराणा, भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंसाठी मोठी गर्दी होत असल्याने बाजार परिसरात महिला, पुरुष, मुले तसेच दुचाकी, चारचाकी व ऑटो रिक्षांची प्रचंड वर्दळ दिसून येते.

पूर्वी पोलिस स्टेशनखालील मोकळ्या मैदानाचा वापर दुकाने व वाहनतळासाठी केला जात होता. मात्र सध्या योग्य व्यवस्था नसल्यामुळे विक्रेते व ग्राहक आपली वाहने जुना-शहरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी करतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन अल्पावधीतच लांबच लांब वाहतूक कोंडी निर्माण होते.

तहसील रोडवरील अनेक दुकानदारांनी मर्यादित जागेत दुकाने मांडली असली तरी दुकानासमोर अतिरिक्त जागेत सामान ठेवले जाते. त्यामुळे रस्ता आणखी अरुंद होतो आणि पादचारी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. स्थानिक नागरिकांच्या मते, ही समस्या अनेक वर्षांपासून कायम असूनही नगर प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांच्या मते, ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नसून धोकादायकही आहे. एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास, गर्भवती महिलेची प्रसूतीची वेळ आल्यास किंवा गंभीर रुग्णाला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकत नाही. त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बाजाराच्या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत असल्याचीही तक्रार नागरिकांनी केली आहे.

जुना-शहर व कासारखेडा परिसरातील नागरिकांनी नगर प्रशासन आणि पोलिस विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे, जेणेकरून साप्ताहिक बाजार नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार नाही.

balapur

बाजारासाठी स्वतंत्र जागा व वाहनतळाची व्यवस्था करावी, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. “बाजारासाठी योग्य जागा निश्चित करून वाहतूक व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी नगरसेवक नासीर हुसेन यांनी केली.

balapur

     “बाळापूरमध्ये पाणीपुरवठ्याबाबत दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. प्रत्यक्षात पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

जावेद इक्बाल (AIMIM)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top