Mahabreaking

[breaking_news]

Training for Census 2027 :जनगणना 2027 साठी बाळापूरात प्रशिक्षणाला सुरुवात; दोन टप्प्यांत प्रगणक-पर्यवेक्षकांना मार्गदर्शन

Training for Census 2027 : नगर पालिका प्रशासनाच्या वतीने  आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रशासनाने यासाठी सुसज्ज तयारी केली आहे. देशातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या जनगणनेचा बिगुल वाजल्यानंतर राज्यभरात तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्रात 23 एप्रिल ते 8 मे या कालावधीत प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Training for Census 2027

जनगणनेचा बिगुल; बाळापूर नगर परिषदेकडून नियोजनबद्ध तयारी

जाकीर अहमद 

बाळापूर : नगर पालिका प्रशासनाच्या वतीने  आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रशासनाने यासाठी सुसज्ज तयारी केली आहे. देशातील महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या जनगणनेचा बिगुल वाजल्यानंतर राज्यभरात तयारीला वेग आला आहे. महाराष्ट्रात 23 एप्रिल ते 8 मे या कालावधीत प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

अकरावी प्रवेशासाठी नवी नियमावली; पाच ऑनलाइन फेऱ्यांत प्रक्रिया होणार पूर्ण

याच अनुषंगाने बाळापूर नगर परिषदेकडूनही नियोजनबद्ध पद्धतीने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचे चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत पार पडत आहे. पहिला टप्पा 28 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 दरम्यान सुरू असून, दुसरा टप्पा 4 मे ते 6 मे 2026 या कालावधीत होणार आहे.

सध्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहात सुरू आहे. या प्रशिक्षणात एकूण 48 प्रगणक आणि पर्यवेक्षक सहभागी झाले असून, त्यांना जनगणनेच्या विविध पैलूंविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सहायक शिक्षक आसिफ मुस्तफा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. ते दररोज सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मनापासून प्रशिक्षण देत आहेत.

प्रशिक्षणार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. दिवसभराच्या प्रशिक्षणादरम्यान भोजन व चहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या तीव्र उकाड्याचा विचार करून प्रशिक्षण सभागृहात कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. चार्ज अधिकारी राहुल कंकाळ यांच्या पुढाकारामुळे प्रशिक्षणार्थींना आरामदायी वातावरण मिळत असून, त्यामुळे ते पूर्ण एकाग्रतेने प्रशिक्षण घेत असल्याचे चित्र आहे.

जनगणना 2027 च्या दृष्टीने हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. या माध्यमातून प्रगणक आणि पर्यवेक्षकांना डेटा संकलन, नोंद प्रक्रिया, अचूक माहिती नोंदविण्याच्या पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन दिले जात आहे. भविष्यातील नियोजन आणि धोरणात्मक निर्णयांसाठी जनगणना महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे या प्रशिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.  बाळापूरमध्ये सुरू असलेल्या या प्रशिक्षणामुळे जनगणना 2027 ची प्रक्रिया अधिक सक्षम आणि परिणामकारक होण्यास मदत होणार असून प्रशासनाची तयारी योग्य दिशेने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top