MIDC land : शहरातील महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळच्या मालकीची असलेल्या १६ एकर जागा विकण्याचा घाट रचला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या जमीनीत अकोल्यातील शेकडो लोकांची फसवणूक झाली असून एक तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान काही लोकांनी या जागेवर ताबा घेवून बांधकाम सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे एमआयडीसीच्या अधिकार्यांचे याविषयी मौन असल्याचे चित्र आहे.

अनेकांनी घेतला जमीनीचा अनधीकृत ताबा; एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार
अकोला : शहरातील महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळच्या मालकीची असलेल्या १६ एकर जागा विकण्याचा घाट रचला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या जमीनीत अकोल्यातील शेकडो लोकांची फसवणूक झाली असून एक तक्रार एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान काही लोकांनी या जागेवर ताबा घेवून बांधकाम सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे एमआयडीसीच्या अधिकार्यांचे याविषयी मौन असल्याचे चित्र आहे.
स्थानिक एमआयडीसी फेस क्रमांक दोन मधील सर्व्हे क्रमांक ५५,२,ब मधील ४ हेक्टर ६० आर आणि २४ हेक्टर १४ आर म्हणजेचं १६ एकर २७ गुंठे जमीन गेल्या अनेक वर्षापासून अकोला एमआयडीसीच्या मालकीची आहे. गाव नमुना सात मध्ये तशी रितसर नोंद आहे. जमिनीचे तार कुंपण नसल्याने काही लोकांनी थेट मालकी हक्क दाखवून सदर जमीन विकायला सुरूवात केली.कोणतेही मालकी हक्क नसताना बनावट मुख्यत्यारपत्राच्या आधारे आतापर्यंत शेकडो लोकांनी या जमीनीचा विसार करून दिले गेलेत.विसार होऊन अनेक वर्ष होत असतानाही खरेदी करून देण्यास मात्र टाळाटाळ करण्यात येत आहे. खरेदीसंदर्भात लोकांना उडवाउडविची उत्तरे दिली जात आहे. यातून सुरेश देशमुख नामक व्यक्तीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात पहिली तक्रार देखील दाखल केली आहे.पोलिसांनी याप्रकरणी चौकशी केली असता आता मोठे कोट्यवधीचे घबाड समोर येत आहे. दरम्यान विसार करून दिलेली जमीन खरेदी करून दिली जात नसल्याने काही लोकांनी या जमीनीचा ताबा घेतला आहे. काहींनी चक्क बांधकामही सुरू केले आहेत.एमआयडीसी अधिकार्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे अकोल्यातील कोट्यवधीची जमीन वाद्यांत सापडली आहे.
तीन प्रतिष्ठीत लोकांचीही फसवणूक
स्थानिक जठारपेठ चौकातील नामवंत वैद्यकीय अधिकारी, बसस्थानकजवळील बार मालक आणि एका बिल्डर्सने देखील स्वस्त दरात जमीन मिळत आहे. म्हणून कोट्यवधीची जमीन उपरोक्त सर्वेमधून घेतली. मात्र खरेदी होत नसल्याने आणि जागा मिळत नसल्याने यांची मोठी फसवणूक झालेली आहे.
जमीनीवर कुंपण नसल्याने अतिक्रमण वाढले
अनेक वर्षांपासून उपरोक्त जमीन एमआयडीसीची आहे. मात्र एमआयडीसी प्रशासनाने कोट्यवधी रूपयांच्या या जमीनीवर कुंपण घेरले नाही. त्यामुळे परिसरातील लोकांनी या जमीनीवर ताबा घेत मालकी हक्क दाखविणे सुरू केले. यातील काही बहाद्दरांनी तर चक्क एमआयडीसीच्या मालकीची जामीनच विक्रीला काढण्याची हिम्मत केली आहे.

