Mahabreaking

[breaking_news]

Library in Balapur Remains Closed;बाळापूरात वाचनालय ‘बंद’च; विद्यार्थ्यांसाठी तातडीने सुरू करण्याची मागणी

Library in Balapur Remains Closed; शहरात नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दोन मजली भव्य इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पणही झाले. मात्र, अद्यापही या इमारतीत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.  विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले वाचनालय व अभ्यासिका तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बाळापूर नगरच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Library in Balapur Remains Closed

अभ्यासिकेअभावी विद्यार्थ्यांचे हाल; अभाविपचे नगर परिषदेला निवेदन

बाळापूर : शहरात नगर पालिका प्रशासनाच्या वतीने दोन मजली भव्य इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पणही झाले. मात्र, अद्यापही या इमारतीत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.  विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेले वाचनालय व अभ्यासिका तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बाळापूर नगरच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाभरात उद्या इयत्ता चौथी, सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा, तयारी पूर्ण

२४ फेब्रुवारी आणि २४ एप्रिल रोजी सादर करण्यात आलेल्या निवेदनात विद्यार्थ्यांच्या मूलभूत अडचणींकडे लक्ष वेधण्यात आले. सन २०२१ मध्ये शहरात दोन मजली भव्य वाचनालय इमारत उभारून त्याचे लोकार्पणही झाले; मात्र अद्यापपर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्याने ही इमारत वापराविना बंद अवस्थेत आहे.

शहरात शासकीय वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध नसल्याने स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन खाजगी अभ्यासिकांचा आधार घ्यावा लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून, वाढत्या खर्चामुळे अनेकांचे शिक्षण अर्धवट राहण्याची वेळ येत आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अभाविप पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रश्न मांडले. त्यानुसार अभाविपने पुढाकार घेत नगर परिषदेला निवेदन देत वाचनालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली. “जोपर्यंत ही समस्या मार्गी लागत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवू,” असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी अभाविप बाळापूर नगर सहमंत्री सुजलसिंह नेरवैय्या, जिल्हा सहसंयोजक गणेश कापसे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता नगर परिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top