Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

District Chiefs Daughter :जिल्हाप्रमुखांच्या लेकीची स्वकर्तृत्वाने झेप; लोकसेवा आयोगात राज्यात ९वा क्रमांक

District Chiefs Daughter : शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची कन्या शीतल जालिंदर बुधवत हिने स्वकर्तृत्व, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत तरुणांसमोर नवा आदर्श उभा केला आहे.  राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ‘क’ संवर्गाच्या निकालात शीतलने खुल्या महिला प्रवर्गातून राज्यात नववा क्रमांक पटकावत बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तिची मंत्रालयात कर सहाय्यक पदावर निवड झाली आहे.

District Chiefs Daughter

परिश्रम, जिद्द आणि शिक्षणाची ताकद; शीतल बुधवतचा प्रेरणादायी यशोगाथा

पंडीत सावळे

मासरूळ :  शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची कन्या शीतल जालिंदर बुधवत हिने स्वकर्तृत्व, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत तरुणांसमोर नवा आदर्श उभा केला आहे.  राज्य लोकसेवा आयोगाच्या गट ‘क’ संवर्गाच्या निकालात शीतलने खुल्या महिला प्रवर्गातून राज्यात नववा क्रमांक पटकावत बुलढाणा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. तिची मंत्रालयात कर सहाय्यक पदावर निवड झाली आहे.

गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेशी निष्ठेने जोडलेले असलेले जालिंदर बुधवत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राजकीय क्षेत्रात प्रभावी स्थान असूनही त्यांनी आपल्या मुलांना राजकारणापासून दूर ठेवत शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. याच संस्कारांची फळे आज शीतलच्या यशातून दिसून आली आहेत.

शीतलने माध्यमिक शिक्षण बुलढाण्यातील भारत विद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे इंग्रजी विषयात बीए पदवीचे शिक्षण घेतले. पदव्युत्तर शिक्षणानंतर तिने राज्य शासनाच्या सेवेत जाण्याचा निर्धार केला आणि पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची शिस्तबद्ध तयारी सुरू ठेवली.

तिच्या या सातत्यपूर्ण अभ्यासाचे फळ तिला आधीही मिळाले होते. यापूर्वी शीतलने नागपूर महानगरपालिका येथे कर सहाय्यक पद मिळवत पहिले यश संपादन केले होते. मात्र त्यावर न थांबता तिने अधिक मोठ्या ध्येयासाठी झटत राहून आता मंत्रालयातील कर सहाय्यक पदावर निवड मिळवली, हे तिच्या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे द्योतक ठरले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top