Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Tehsildar Ajit Divate :सर्वसामान्यांची कामे एकाच छताखाली व्हावीत हा शासनाचा उद्देश : तहसीलदार अजित दिवटे

Tehsildar Ajit Divate : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे सुमारे ६० किलोमीटर अंतर कापून जावे लागते. ही गैरसोय दूर करून नागरिकांची कामे एकाच ठिकाणी आणि जलद गतीने व्हावीत, यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे प्रत्येक महसूल मंडळात आयोजन केले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा साखरखेर्डा येथून सुरू करण्यात आला असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अजित दिवटे यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

Tehsildar Ajit Divate

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचा थाटात शुभारंभ

साखरखेर्डा :ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना छोट्या-छोट्या कामांसाठी साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे सुमारे ६० किलोमीटर अंतर कापून जावे लागते. ही गैरसोय दूर करून नागरिकांची कामे एकाच ठिकाणी आणि जलद गतीने व्हावीत, यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे प्रत्येक महसूल मंडळात आयोजन केले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा साखरखेर्डा येथून सुरू करण्यात आला असल्याचे प्रतिपादन तहसीलदार अजित दिवटे यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी केले.

‘महाराजस्व समाधान शिबिर’ ग्रामीण लाभार्थ्यांसाठी ठरणार पर्वणी – संजय खडसे

यावेळी शिवसेना नेते योगेश जाधव, सरपंच सौ. ज्योती अमित जाधव, माजी सरपंच महेंद्र पाटील, भाजपाचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे, अमित जाधव, शिवसेना नेते गंभीरराव खरात, भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, शिदींचे सरपंच अशोक खरात, गोरेगावचे सरपंच वसुदेव पंचाळ, गोपाल राजपूत, शुभम राजपूत, गणपत अवचार, माधव नाईक यांच्यासह विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार प्रकरणे, सातबारा उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांना दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंदर्भातील प्रकरणांचा निपटारा, पांदण रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज तसेच अ‍ॅग्रीस्टॅक आणि पीएम किसान नोंदणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

याशिवाय कृषी विभागाच्या वतीने १३ शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले, तर अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली.

या शिबिरात महसूल विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित असताना पंचायत समितीचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. तसेच वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारीही अनुपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महसूल मंडळाधिकारी रघुनाथ सोळंके, ग्राम महसूल अधिकारी संजय शिंगणे, प्रशांत पोंधे, लखन राजपूत, गिऱ्हे, कृषी अधिकारी गणेश बंगाळे, छबुलाल कोल्हे आणि महसूल कर्मचारी संजय सोनवणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल अधिकारी शिवानंदन वाकदकर यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top