Mahabreaking

🔴 BREAKING
the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार

women :मातृतीर्थ देऊळगाव राजाची प्रशासनिक धुरा महिलांच्या खांद्यावर

women :माँ जिजाऊंच्या पावन भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा परिसरात आज प्रशासनाची धुरा मोठ्या आत्मविश्वासाने महिलांच्या हातात आहे. पोलीस, महसूल आणि नगर प्रशासन अशा विविध महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी कार्यरत असून कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि संवेदनशीलतेची सांगड घालत त्या प्रशासन अधिक सक्षम करत आहेत. घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत या महिला अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

women

जागतिक महिला दिन विशेष : कर्तव्य, धाडस आणि संवेदनशीलतेची सांगड घालत महिला अधिकारी घडवत आहेत सक्षम प्रशासन

गजानन तिडके

देऊळगाव राजा : माँ जिजाऊंच्या पावन भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळगाव राजा परिसरात आज प्रशासनाची धुरा मोठ्या आत्मविश्वासाने महिलांच्या हातात आहे. पोलीस, महसूल आणि नगर प्रशासन अशा विविध महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी कार्यरत असून कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि संवेदनशीलतेची सांगड घालत त्या प्रशासन अधिक सक्षम करत आहेत. घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलत या महिला अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.

 

मनीषा कदम (पोलीस उपविभागीय अधिकारी, देऊळगाव राजा)

women

“प्रशासकीय सेवेत काम करताना कुटुंब आणि कर्तव्य यामध्ये समतोल राखणे हे मोठे आव्हान असते. पोलीस विभागात सुट्टीचा ठराविक दिवस नसतो. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ प्रतिसाद द्यावा लागतो. त्यामुळे जबाबदारी अधिक वाढते. मात्र वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळत असल्याने ही जबाबदारी निभावणे शक्य होते. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येत प्रशासनात आपले स्थान निर्माण करावे,” असे त्या सांगतात.

 

 

वैशाली डोंगरजाळ (तहसीलदार, देऊळगाव राजा)

women

“महसूल विभागात काम करताना अनेक आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जावे लागते. विशेषतः अवैध रेती उत्खनन रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालताना संघर्षाचे प्रसंगही येतात. मात्र कायद्याची अंमलबजावणी करताना सातत्य आणि धैर्य आवश्यक असते. प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि कुटुंबाची कर्तव्ये या दोन्ही गोष्टी संतुलित ठेवणे हेच महिलांसाठी खरी ताकद ठरते,” असे त्या सांगतात.

 

सायली जाधव (नायब तहसीलदार, महसूल)

women

“महसूल विभागात काम करताना नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणे हे आमचे प्राधान्य असते. अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी रात्रीच्या कारवायांमध्ये अनेकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. तरीही वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळे कामात सातत्य ठेवता येते. प्रशासनिक सेवा आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत काम करणे हीच खरी प्रेरणा आहे,” असे त्या नमूद करतात.

 

माधुरी सिपणे (नगराध्यक्षा, देऊळगाव राजा)

women

“नगराध्यक्षा म्हणून काम करताना शहरातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या तक्रारी आणि महिला सक्षमीकरण यांना प्राधान्य देणे हे माझे ध्येय आहे. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे. महिलांनी नेतृत्व स्वीकारून समाजाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे,” असे त्या सांगतात.

 

एकूणच, माँ जिजाऊंच्या पवित्र मातृभूमीत प्रशासनाची धुरा सांभाळणाऱ्या या महिला अधिकारी कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि संवेदनशीलतेच्या बळावर समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top