Mahabreaking

🔴 BREAKING
the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार

Maharajaswa Samadhan Shibir :‘महाराजस्व समाधान शिबिर’ ग्रामीण लाभार्थ्यांसाठी ठरणार पर्वणी – संजय खडसे 

Maharajaswa Samadhan Shibir : महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा १) आयोजित करण्यात आले आहे. दि. ७ मार्च रोजी तालुक्यातील तुळजापूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Maharajaswa Samadhan Shibir

देऊळगाव राजा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा १) उत्साहात

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : महसूल विभागांतर्गत ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ (टप्पा १) आयोजित करण्यात आले आहे. दि. ७ मार्च रोजी तालुक्यातील तुळजापूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील कास्तकार तसेच विविध विभागांतील लाभार्थ्यांसाठी महसूल, कृषी, पशुवैद्यकीय, पंचायत समिती आणि विविध घरकुल योजनांशी संबंधित कामे शिबिरात जागेवरच करण्यात येत असल्याने हे शिबिर ग्रामीण लाभार्थ्यांसाठी चांगली संधी ठरणार असल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

शासनाने दिलेल्या आदेशानुसार ग्रामपातळीवर विविध विभागांच्या कार्यालयीन कामकाजासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करून प्रलंबित कामे जागेवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तुळजापूर मंडळातील विविध गावांतील लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

सदर शिबिरात ‘जिवंत सातबारा’ अंतर्गत १३० वार्षिक नोंदी करण्यात आल्या. तसेच विविध कार्यालयीन कामांबाबत एकूण ५८ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ११ लाभ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. नोंदीसाठी शिबिरात एकूण १० अर्ज प्राप्त झाले असून त्रुटी नसलेले अर्ज जागेवर मंजूर करण्यात आले.

Maharajaswa Samadhan Shibir

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजय खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदाताई कायंदे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, प्रकल्प अधिकारी तारा मुंडे, कार्यक्रमाध्यक्ष माजी सरपंच भानुदास कोल्हे यांच्यासह मंडळ अधिकारी विनोद डोईफोडे, रामदास मान्टे, पंढरी जायभाय, ग्राम महसूल अधिकारी बबन काकड, संजय बरांडे, गजानन टेकाळे, सुमित जाधव, परसराम सोळंके, कृषी अधिकारी दिलीप वाघ, मंडळ कृषी अधिकारी सुधाकर कंकाळ, उपकृषी अधिकारी अनंत देशमुख, सहाय्यक कृषी अधिकारी श्रीकांत पडघान, सुरेश दीपक दंदाले, मनोज कोथळे,  मनोज कोथळे यांच्यासह , ग्रामसेवक राठोड, ग्रामपंचायत ऑपरेटर लक्ष्मण कोल्हे,महसूल सेवक रामप्रसाद शेरे, विठ्ठल हरणे, बुरकुल,अंबादास पैठणी,अतिश पान्नासे अनुलोम भागजन सेवक सिदखेडराजा,तसेच महसूल व कृषी विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर नागरे, अंगणवाडी सेविका सुनीता काळे, संगीता मोरे शाळेचे तसेच अंगणवाडीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

या अभियानांतर्गत महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तालुका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंडळ स्तरावरील शिबिरे ७ व १४ मार्च २०२६ रोजी, तालुका स्तरावरील शिबिरे १० एप्रिल ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान, तर नगर परिषद व नगर पंचायत स्तरावरील शिबिरे ८ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, ‘लोकसेवा हक्क कायदा’ अंतर्गत तत्काळ सेवा, डिजिटल ७/१२ बाबत जनजागृती आणि अकृषक (NA) परवानगी प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. तसेच भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण, संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन व आदेश वाटप करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे ‘Ease of Doing Business’ अंतर्गत सर्व महसूल अधिकारी — तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी — एकाच ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत. ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि पीएम किसान योजनेतील त्रुटीदेखील याठिकाणी दूर करण्यात येणार आहेत.

देऊळगाव राजा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित महसूल मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top