Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

Accident faked :अपघाताचा बनाव फसला; पतीनेच एक लाखाची सुपारी देऊन केली पत्नीची हत्या

Accident faked : कवठळ परिसरात झालेला अपघात म्हणून समोर आलेल्या घटनेमागे भीषण कट दडलेला असल्याचे अखेर उघड झाले आहे. पातुर्डा येथील महिला शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे (वय ३७) यांच्या मृत्यूचा प्रकार हा अपघात नसून त्यांच्या पतीनेच सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक उघडकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीसह मालवाहु वाहनाच्या चालकास अटक केली आहे.

Accident faked

 शिक्षिकेच्या अपघात प्रकरणाला वेगळी कलाटणी; पतीसह दोघांना पोलिसांनी केली अटक

 जळगाव जामोद : कवठळ परिसरात झालेला अपघात म्हणून समोर आलेल्या घटनेमागे भीषण कट दडलेला असल्याचे अखेर उघड झाले आहे. पातुर्डा येथील महिला शिक्षिका वृषाली प्रकाश गावंडे (वय ३७) यांच्या मृत्यूचा प्रकार हा अपघात नसून त्यांच्या पतीनेच सुपारी देऊन घडवून आणलेला खून असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक उघडकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पोलिसांनी शिक्षिकेच्या पतीसह मालवाहु वाहनाच्या चालकास अटक केली आहे.

नांदुरा शहरात धावत्या बसला आग; चालकाच्या सतर्कतेने ३० प्रवाशी बचावले

या प्रकरणी पोलिसांनी मृतक शिक्षिकेचे पती प्रकाश अनंता गावंडे (रा. पातुर्डा) तसेच धडक देणाऱ्या टाटा छोटा हत्ती मालवाहू वाहनाचा चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी यांना अटक केली आहे. सुपारी देण्यामध्ये मध्यस्थी करणारा आरोपी मंगेश चौहूलकर (रा. पातुर्डा) याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींना ७ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली गावंडे या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती प्रकाश गावंडे यांच्याशी वारंवार वाद होत असल्याने त्यांनी संग्रामपूर पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळाची तक्रारदेखील दिली होती.

दरम्यान ३ मार्च रोजी कवठळ परिसरात त्यांच्या स्कूटरला मालवाहू वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने त्या ठार झाल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासवण्यात आले.मात्र मृतक शिक्षिकेचा भाऊ सुमित डोसे यांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचे पोलिसांना सांगत घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला.

तपासात उघड झाले की, पती प्रकाश गावंडे व त्याचा मित्र मंगेश चौहूलकर यांनी वाहन चालक मनीष सूर्यवंशी याला एक लाख रुपयांची सुपारी देऊन वृषाली गावंडे यांच्या स्कूटरला मुद्दाम धडक देण्याचा कट रचला होता. त्यानुसार एमएच २८ बीबी ५७५३ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या एमएच २८ एएल ५८१५ क्रमांकाच्या स्कूटरला मागून धडक देऊन हा खून घडवून आणण्यात आला. या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top