Mahabreaking

[breaking_news]

Youth murdered: उर्दू हायस्कूलसमोर तरुणाचा चाकू-तलवारीने खून; तासाभरात तिघे आरोपी जेरबंद

Youth murdered: उर्दू हायस्कूलच्या मैदानासमोरील रस्त्यावर जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणावर धारदार चाकू व तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या एका तासात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

Youth

  जुन्या प्रेमसंबंधातून रक्तरंजित वाद; २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, तिघे पोलिसांच्या ताब्यात

अकोला : उर्दू हायस्कूलच्या मैदानासमोरील रस्त्यावर जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय तरुणावर धारदार चाकू व तलवारीने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना रविवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या एका तासात तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

मृत तरुणाचे नाव नितेश ऊर्फ मायकल श्रीराम जाधव (वय २२) असे आहे. याप्रकरणी मंजू निलेश जाधव (वय २२, रा. आंबेडकर नगर, नवीन बसस्थानकाच्या मागे, अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश ऊर्फ मायकल जाधव हा रविवारी रात्री मित्रांसह उर्दू हायस्कूलच्या मैदानात बसला होता. यावेळी रोहन ऊर्फ अनिकेत संतोष दामोदर, अंश प्रदीप सिरसाट आणि ऋषभ ऊर्फ सागर विजय कृष्णपल्लोवार हे तेथे आले. जुन्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी संगनमत करून नितेशवर धारदार चाकू व तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितेशचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी आवश्यक सूचना देऊन आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले.

पोलीस निरीक्षक मालती कायटे यांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करून विविध ठिकाणी रवाना केली. पोलिसांनी गोपनीय माहितीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरात शोधमोहीम राबवत असताना पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तिन्ही आरोपींना अवघ्या एका तासाच्या आत पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

तिघांना अटक

या प्रकरणात रोहन ऊर्फ अनिकेत संतोष दामोदर (वय २२, रा. आंबेडकर नगर, अकोला), अंश प्रदीप सिरसाट (वय २१, रा. राहुल नगर, ह.मु. टेलिकॉम कॉलनी, अकोला) आणि ऋषभ ऊर्फ सागर विजय कृष्णपल्लोवार (वय १९, रा. आंबेडकर नगर, अकोला) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात अप. क्र. ६०५/२०२६, कलम १०३ (१), ३ (५) व ३५२ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मालती कायटे, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पवार तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत आजलसांडे, पोलीस कॉन्स्टेबल शक्ती कांबळे, पवन सिरसाट आणि एकनाथ त्रिकाळ यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top