Mahabreaking

[breaking_news]

Youth attacked :किरकोळ वादातून युवकावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा

Youth attacked : किरकोळ वादातून एका युवकावर  कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ६ जून रोजी सकाळी वरवंड येथे घडली. या हल्ल्यात रहिम शहा इस्माईल शहा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Youth attacked

वरवंड येथे भरदिवसा जीवघेणा हल्ला; जखमी युवकावर उपचार सुरू

बुलढाणा : किरकोळ वादातून एका युवकावर  कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ६ जून रोजी सकाळी वरवंड येथे घडली. या हल्ल्यात रहिम शहा इस्माईल शहा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रफिक शहा नुरशहा (रा. वरवंड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा आतेभाऊ रहिम शहा इस्माईल शहा हा गावातील एका बांधकामस्थळी मजुरीचे काम करीत होता. ६ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास वरवंड बसस्थानकाजवळ रहिम शहा आणि गावातीलच अर्जुन श्रीराम इंगळे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले. मात्र, काही वेळानंतर सकाळी सुमारे १०.४५ वाजता बांधकाम सुरू असलेल्या घरासमोर आरोपी अर्जुन इंगळे याने रहिम शहाला गाठले. यावेळी दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. वाद वाढताच आरोपीने जवळील कुऱ्हाडीने रहिम शहाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि तो जागीच कोसळला. हल्ल्यानंतर आरोपीने “मी तुला संध्याकाळपर्यंत जीवाने मारून टाकतो,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या सतिश संतोष बरडे, सतिश सुधीर इंगळे, जगदीश नामदेव जेवघाले व उज्वला मनोज खेडेकर यांनी तत्परता दाखवत मध्यस्थी केली. त्यांनी आरोपीच्या हातातील कुऱ्हाड काढून घेत त्याला रोखून धरले.

जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रहिम शहाला त्याचे मित्र सतिश बरडे व सतिश इंगळे यांनी मोटारसायकलवरून तातडीने वरवंड येथील स्थानिक दवाखान्यात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अर्जुन श्रीराम इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top