Mahabreaking

[breaking_news]

Sindkhed Raja Market Committee :सिंदखेडराजा बाजार समितीच्या सत्तासूत्रांवर कोणाची पकड? सभापती-उपसभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष

Sindkhed Raja Market Committee :सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड ९ जून रोजी होत असून, या निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीच्या नेतृत्वाची धुरा अखेर कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sindkhed Raja Market Committee

 सभापतीपदासाठी शेजुळ-जाधव, उपसभापतीपदासाठी काबरा-बेंडमाळी चर्चेत; ९ जूनला बाजार समितीच्या नेतृत्वाचा फैसला

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड ९ जून रोजी होत असून, या निवडीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे बाजार समितीच्या नेतृत्वाची धुरा अखेर कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्याच्या राजकीय समीकरणानुसार बाजार समितीतील सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर उपसभापतीपद शिवसेना (शिंदे गट) यांच्या वाट्याला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेश शेजुळ आणि पंकज जाधव यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. तर उपसभापतीपदासाठी शिवसेना (शिंदे गट) कडून राहुल काबरा आणि दिलीप बेंडमाळी यांच्या नावांवर विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.

बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक असून त्यापैकी १० संचालक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), ४ शिवसेना (शिंदे गट) आणि ४ भाजपचे आहेत. मागील कार्यकाळात झालेल्या राजकीय समझोत्यानुसार सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर उपसभापतीपद भाजपकडे होते. भाजपला यापूर्वी उपसभापतीपदाची संधी मिळाल्याने यावेळी शिवसेना (शिंदे गट) यांना प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, सभापतीपदासाठी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करतात, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) आपल्या कोट्यातून कोणाला संधी देते, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

सभापती व उपसभापती निवडीची विशेष सभा ९ जून रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात होणार आहे. या निवडणुकीसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून बी. जे. शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेबाबतच्या नोटिसा सर्व संचालकांना बजावण्यात आल्या असून, सभेला वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या निवडीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बाजार समितीच्या सर्वोच्च पदांवर अखेर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top