Mahabreaking

[breaking_news]

Young Man Commits Suicide :दगडवाडीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ

Young Man Commits Suicide : तालुक्यातील दगडवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  विशाल अजाबराव जायभाये (वय २५, रा. दगडवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Young Man Commits

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील दगडवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  विशाल अजाबराव जायभाये (वय २५, रा. दगडवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या दरम्यान विशाल याने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी सुकदेव कारभारी जायभाये (वय ६२, व्यवसाय शेती, रा. दगडवाडी) यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. पोलिसांनी मर्ग क्रमांक १८/२०२६ कलम १९४ बीएनएस अंतर्गत नोंद केली आहे.

घटनेची नोंद दि. ७ मे रोजी दुपारी १२.५० वाजता करण्यात आली. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड हे करीत असून, पुढील तपास देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.दरम्यान, गत काही दिवसांपासून युवकांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top