Mahabreaking

[breaking_news]

Yoga-Sangam :मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये ‘योग-संगम 2026’ उत्साहात; निरोगी आयुष्यासाठी योगाचा संदेश

Yoga-Sangam : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मॉडेल डिग्री कॉलेज, बुलढाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘योग-संगम-2026’ कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यंदाच्या ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

Yoga-Sangam

‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ थीमला प्रतिसाद; मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये योग दिन साजरा

बुलढाणा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मॉडेल डिग्री कॉलेज, बुलढाणा येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने ‘योग-संगम-2026’ कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. यंदाच्या ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या संकल्पनेला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात प्राध्यापक, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित या कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७ वाजता करण्यात आले होते. महाविद्यालयाचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी तज्ज्ञ योग प्रशिक्षक प्रा. अरुण एस. रिंढे आणि प्रा. सौ. सुनीता गायकी यांनी उपस्थितांना योग, प्राणायाम तसेच विविध आसनांचे प्रात्यक्षिक सादर करून आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ या वर्षाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. प्रत्येक व्यक्तीने निरोगी आणि संतुलित आयुष्यासाठी दैनंदिन जीवनात किमान एक तास योग, प्राणायाम आणि आसनांसाठी दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

तज्ज्ञ योग प्रशिक्षक प्रा. अरुण रिंढे आणि प्रा. सुनीता गायकी यांनी विविध आजारांवर योग आणि प्राणायामाचे होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले. त्यांनी उपस्थितांकडून विविध योगासने करून घेत आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला डॉ. मनोज डांगे, प्रा. शिल्पा इंगळे-पाटील, प्रा. शिला रोकडे, प्रा. दिलीप माने, प्रा. गुलाबराव सोनोने, प्रा. चंद्रशेखर भांदक्कर तसेच शिक्षकेतर कर्मचारी रूपाली गुडधे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. अरुण एस. रिंढे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सुनीता गायकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून निरोगी जीवनशैली, मानसिक संतुलन आणि नियमित योगाभ्यासाचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top