Mahabreaking

[breaking_news]

Woman attacked :खर्चासाठी पैसे मागायला गेलेल्या महिलेवर हल्ला; दात पाडून जीवे मारण्याची धमकी

Woman attacked : तालुक्यातील निमगाव गुरु येथे कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली. खर्चासाठी पैसे मागण्यास गेल्यानंतर संबंधित महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman attacked

कौटुंबिक वाद विकोपाला; निमगाव गुरूत महिलेला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील निमगाव गुरु येथे कौटुंबिक वादातून एका ५५ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी घडली. खर्चासाठी पैसे मागण्यास गेल्यानंतर संबंधित महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोदावरी विश्वनाथ दहीकर (वय ५५, व्यवसाय मजुरी, रा. निमगाव गुरु, ता. देऊळगाव राजा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १४ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्या आरोपींच्या घरी खर्चासाठी पैसे मागण्याकरिता गेल्या होत्या.

यावेळी आरोपी विनोद विश्वनाथ दहीकर, वंदना विनोद दहीकर (रा. निमगाव गुरु), सुगंदाबाई नाथा टोंपे (रा. रामनगर, जि. जालना) आणि गणेश मधुकर घोटे (रा. मंडपगाव, ता. देऊळगाव राजा) यांनी संगनमत करून त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी विनोद दहीकर यांनी गोदावरी दहीकर यांच्या तोंडावर बुक्का मारून त्यांचा दात पाडला. तसेच इतर आरोपींनी त्यांचे केस ओढून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटनेनंतर जखमी महिलेने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. फिर्याद आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 117(2), 115(2), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश नागरे करीत आहेत. घटनेमुळे परिसरात चर्चा रंगली असून कौटुंबिक वादाचे रूप मारहाणीपर्यंत गेल्याने नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top